Umesh Patil's Complaint : अजितदादांकडे उमेश पाटलांची तक्रार; ‘दादा...ह्या नालायक माणसामुळे पक्ष बदनाम होतोय...’

Ramesh Kadam Meet Ajit Pawar ; मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर संबंधांचा गैरवापर व पक्षाची बदनामी केल्याची गंभीर तक्रार केली आहे.
Umesh Patil-Ramesh Kadam- Ajit Pawar
Umesh Patil-Ramesh Kadam- Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on
  1. रमेश कदम यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्याविरोधात तक्रार केली, त्यांच्या राजकीय गैरवापराबद्दल गंभीर आरोप केले.

  2. कदम यांनी उमेश पाटील यांना जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत उभे राहून जिंकून दाखवण्याचे खुले चॅलेंज दिले, अन्यथा राजकारण सोडण्याची घोषणा केली.

  3. कदम यांनी आरोप केला की उमेश पाटील यांच्या वागण्यामुळे मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही उमेदवाराचा चेहरा पाहायला मिळाला नाही, ज्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली.

Solapur, 09 December : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी आज (ता. 09 डिसेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची अजितदादांकडे तक्रार केली आहे. ‘तो तुमच्यासोबत असलेल्या संबंधाचा गैरवापर करत आहे. दादा, अशा नालायक माणसामुळे पक्ष बदनाम होतोय,’ असे उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे खुद्द रमेश कदम यांनीच सांगितले.

उमेश पाटील (Umesh Patil) हा अतिशय नालायक माणूस आहे. पॉलिटिकली इमॅच्युअर माणूस आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेल्या संबंधांचा तो स्थानिक राजकारणात गैरवापर करत आहे. यासंदर्भातील कल्पनाही मी अजित पवार यांना दिली आहे. अजितदादांच्या कानावरही घातलं आहे की, दादा अशा नालायक माणसामुळे नेतृत्वाला अडचण येते. पक्ष बदनाम होतोय.

उमेश पाटील या माणसाची जिल्हा परिषदेलाही निवडून येण्याची लायकी नाही. त्याला माझं उघड चॅलेंज आहे, त्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत कुठूनही उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवावं. उमेश पाटील निवडून आला तर हा रमेश कदम राजकारण सोडून देईल,’ असे खुले चॅलेंजही रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी पाटील यांना दिले.

रमेश कदम म्हणाले, उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, याच्यात दुमत नाही. पण अजित पवार यांच्याशी असलेल्या संबंधांचा तो गैरवापर प्रत्येक ठिकाणी करत आहे. मोहोळ तालुक्यातील लोकांना त्यांच्या गैरवापराबाबत विचारले तर तुम्हाला सांगतील. ज्या पद्धतीने इतर सिनियर नेत्यांची अब्रू काढणं, त्या लोकांच्या विरोधात एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान करणं, विकासाचं राजकारण सोडून सर्वांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते चुकीचे आहे.

Umesh Patil-Ramesh Kadam- Ajit Pawar
Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदमांनी भेट घेतली अजित पवारांची;पण गोडवे गायले शरद पवार, सुप्रिया सुळेंचे!

आम्हीही राजकारणात काम करतो. पण आम्ही कधी पातळी सोडत नाही, राजकीय मर्यादा सोडत नाही. आम्ही प्रत्येकाच्या अनुभवाचा आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखतो. ह्या उमेश पाटलामुळे मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार मिळाला नाही. जो पक्ष सत्तेत आहे, त्या पक्षाला उमेदवार मिळू नये, यापेक्षा दुर्दैव काय म्हणावे, असा सवाल रमेश कदम यांनी केला.

माजी आमदार कदम म्हणाले, अनगर नगरपंचायतीची निवडणूक लढविणे किंवा न लढविण्याचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा होता. तो प्रदेश स्तरावरील निर्णय होता. मी स्थानिक नेता असलो तरी आम्ही पक्षाची लाईन सोडून काम करत नाही. माझ्यावर मोहोळ नगरपरिषदेची जबाबदारी होती. पक्षाने गावात जाऊन काम करायला सांगितलं तर आम्ही गावात जाऊन काम करू. पक्ष आणि नेतृत्व सांगतील त्याप्रमाणे मी करेन.

Umesh Patil-Ramesh Kadam- Ajit Pawar
Rajendra Raut : बार्शी बाजार समितीतील विजयानंतर राऊतांची मोठी घोषणा; ‘ZPच्या सहा अन्‌ पंचायत समितीच्या 12 जागा...’

1. रमेश कदम मुंबईला का गेले होते?

→ जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या विरोधातील तक्रार अजित पवारांना देण्यासाठी.

2. कदम यांनी उमेश पाटील यांच्यावर काय आरोप केले?

→ अजित पवारांशी असलेल्या संबंधांचा गैरवापर आणि स्थानिक नेत्यांचा अपमान केल्याचा आरोप.

3. कदम यांनी उमेश पाटील यांना कोणते चॅलेंज दिले?

→ जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक जिंकून दाखवण्याचे.

4. राष्ट्रवादीला मोहोळ नगरपरिषदेत उमेदवार का मिळाले नाहीत?

→ कदम यांच्या मते, उमेश पाटील यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आणि उमेदवार पुढे येण्यास घाबरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com