
Satara, 23 February : फलटणचा विकास तर आम्ही केलाच, पण पाणीही आणलं. मी अजूनही थकलो नाही. मात्र पायाचं दुखणं आहे. विसाव्या वर्षी क्रिकेट खेळताना लागलेली दुखणी आज ७७ व्या वर्षी कुठं तरी त्रास देणारच ना. पण, डोकं चालतंय त्याला काय करणार. माझं डोकं आहे, तोपर्यंत तुम्ही काहीही काळजी करू नका. खुर्चीत बसवून संपवीन, असा सूचक इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजकीय विरोधकांना दिला.
फलटण तालुक्यातील आंदरुड येथील हुरडा पार्टीत बोलताना रामराजेंनी (Ramraje Naik Nimbalkar) विरोधकांना टोले लगावले. ते म्हणाले, तुम्ही निवडणुकीची का एवढी चर्चा करता, हेच मला कळेनासं झालंय. फार मोठं आक्रीत झालंय, असं मला तरी वाटत नाही. उलट सत्ता नसताना जे कार्यकर्ते आपल्यासोबत असतात, हे खरे निष्ठावंत कार्यकर्ते असतात. आपल्याकडे राहून सत्तेचा उपभोग घेतला आणि आता सत्तेसाठी दुसरीकडे गेले आहेत. खरं आपल्याला ती सूज आलेली होती. त्यांची आता आठवणही काढू नका. त्यांची स्वप्नंही पाहू नका. त्यांनी त्यांची दिशा पकडलेली आहे. आता आपण आपली दिशा पकडली पाहिजे.
मी १९९१ मध्ये माझ्या आयुष्यातील पहिले राजकीय भाषण फलटणच्या (phaltan) गजानान चौकात केले. त्या अगोदर आम्ही कोणी राजकारणात नव्हतो. त्या वेळचं फलटणचं राजकारण आम्हाला पटत नव्हतं. सत्तेसाठी राजकारण केलं जात होतं. सर्वसामान्या लोकांना त्रास दिला जात होता. फलटणमधील गलिच्छ राजकारण संपवण्यासाठी मी या क्षेत्रात पडलो. त्या वेळी लोकं नातं विसरून एकमेकांच्या लग्नातसुद्धा जात नव्हते. हे सगळं आपण मिटवून सर्वांना एकत्र केले, असा दावाही रामराजे यांनी केला आहे.
रामराजे म्हणाले, आतापर्यंत जे केलं आहे, ते सांभाळायाची कुवत कोणत्या कार्यकर्त्यांमध्ये आणि तालुक्याच्या नेतृत्वामध्ये आहे, हे आम्हाला जरा सांगा. आम्ही राजकीय भांडणं सोडवतो. आम्हाला कोणाबद्दल बोलायचं नाही. पण, हे सगळं गणित जे गेलं आहे. उरमोडी झालं नसतं तर माणला पाणी कुठून मिळालं असतं. जिहे काठापूरला अर्धा टीएमसी पाणी मी दिलं. पाणी म्हटलं की राजकारण आलं. मला आता त्यात पडायचं नाही. आपण आपला तालुका सांभाळायचा.
आमच्यावर गेली ३० ते ४० वर्षांपासून जो विश्वास फलटणच्या जनतेने टाकला आहे. तो विश्वास तेवढा घालवू नका, एवढीच आमची तुम्हाला विनंती असणार आहे. राज्यात आपण मतं मिळवायला कमी पडलोय, कामांमध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही. त्या कामाची मतं मिळविण्यात आपण कमी पडलोय. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की, राज्यातील दोन मोठे पक्ष आपल्या विरोधात होते, असेही रामराजे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.