Pdcc Bank Election : हिवरेकरांची पुन्हा डावखरेंनाच पसंती : वसंतरावांनंतर आता ॲड निरंजन डावखरेंचा ‘पीडीसीसी’साठी ठराव

Niranjan Davkhare Resolution : हिवरे सहकारी सोसायटीने दिवंगत वसंतराव डावखरे यांची परंपरा कायम ठेवत त्यांचे पुत्र आमदार निरंजन डावखरे यांचा पुणे जिल्हा बँकेसाठी मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव केला आहे.
Pdcc Bank Election
Pdcc Bank ElectionSarkarnama
Published on
Updated on

Shikrapur, 19 September : शिरूर तालुक्यातील हिवरे येथील सरपंचपदापासून १९८० च्या दशकात आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा करत सलग १८ वर्षे (१९९८ ते २०१६) विधान परिषदेच्या उपसभापतिपदी राहण्याचा विक्रम करणारे (स्व.) वसंतराव डावखरे यांना हिवरे सहकारी सोसायटीने कायम पुणे जिल्हा बॅंकेचे मतदार प्रतिनिधी म्हणून पाठविले आहे. त्यांच्या पश्चातही हीच परंपरा कायम राखत गावाने डावखरे यांचे चिरंजीव आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांचा मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव केला आहे.

दरम्यान, शिरुरच्या राजकारणावर ज्या दिवंगत माजी खासदार बापूसाहेब थिटे यांनी आपली हुकुमत गाजविली त्यांच्या केंदूर गावाने बन्सीलाल पऱ्हाड यांना एकमुखी ठराव देत गावची एकी दाखवून दिली आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी चुरशीमुळे चक्क पोलिस बंदोबस्तात मतदार प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव केले जात आहे. कासारी येथे राजेंद्र काकडे यांना ठरावाच्या कारणावरून मारहाण होऊन गुन्हा दाखल झाला. त्यामुळे अनेक गावांनी पैसे भरून पोलिस बंदोबस्त ठेवत ठराव केले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी उपसभापती (स्व.) वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांना हिवरे गावाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी एकमुखाने मतदार प्रतिनिधी पाठवत परंपरा कायम राखली आहे.

Pdcc Bank Election
Eknath Shinde On Satara Dcc Bank : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले, ‘आता...’

दरम्यान, दिवंगत वसंतराव डावखरे यांनी १९८४ च्या सुमारास हिवरे (ता. शिरुर) गावच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पुढे १९८६ मध्ये ते ठाणे महापालिकेचे नगरसेवक आणि १९८७ मध्ये ठाण्याचे महापौर बनले. त्यानंतर १९९२ पासून सलग ५ वेळा ते विधान परिषदेचे आमदार निवडून गेले. त्यांनी तब्बल १८ वर्षे विधान परिषदेचे उपसभापती म्हणून काम पाहिले.

वसंतराव डावखरे यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव अ‍ॅड आमदार निरंजन डावखरे यांनीही हिवरे गावाशी आपली नाळ कायम ठेवली आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा ते विधान परिषदेवर गेले आहेत. मात्र, हिवरे गावाशीही त्यांनी आपली नाळ कायम राखली आहे. त्याच स्नेहातून गावानेही जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी डावखरे कुटुंबाशी नाते जपत मतदान प्रतिनिधी पाठविले आहे.

Pdcc Bank Election
Mohol Panchayat Samiti : ‘निधीवाटपात भाजपला साथ देत विरोधकांना केलं टार्गेट?’: मोहोळच्या बीडीओला ZP सीईओंचा दणका

शिरुरच्या राजकारणात माजी गृहराज्य मंत्री बापूसाहेब थिटे यांच्या केंदूर या मूळ गावी या वेळी जिल्हा बॅंकेसाठी बन्सीलाल कांताराम पऱ्हाड यांचा एकमुखी ठराव झाल्याची माहिती माजी सरपंच प्रमोद पऱ्हाड यांनी दिली. दोन्ही गावांमध्ये शांततेत ठराव झाले, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com