

Mumbai News: महायुती सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात एकत्र आल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही युतीचे आता जवळपास शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे. शिवतीर्थावरील भेटीगाठी, विविध कार्यक्रम आणि निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या मोर्चातही ठाकरे बंधूंची एकी दिसून आली आहे. मात्र,आता ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) फूट पडल्याचा दावा केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात आला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी(ता.3 नोव्हेंबर) ठाकरे बंधूंच्या युतीवर मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानं आमची महायुती अधिक मजबूत झाली आहे. पण ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. काँग्रेस त्यांच्या सोबत यायला तयार नसल्याचा गौप्यस्फोट आठवले यांनी करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुंबईत महायुतीचा झेंडा फडकेल असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी मुंबईतल्या मराठी-अमराठी मतदानाच्या टक्केवारीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, सगळी जी परिस्थिती आहे ती आमच्या महायुतीच्या बाजूने आहे. 40 टक्के मराठी मतदान असून त्यात 20-22 टक्के मतदान आमच्या बाजूने होईल, 60 टक्के अमराठी मतदान आमच्यासोबत असंही त्यांनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबतही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना खोचक टोला लगावला. त्यांच्याकडे सभेला गर्दी करण्याची कुवत असली तरी, मात्र मतदान मिळवण्याची कुवत नसल्याचं सांगितलं. तसेच मुंबईत कौल त्यांच्या बाजूने जाणार नाही ,अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
विरोधकांनी राज्यात सध्या पेटवलेल्या मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाच्या मुद्द्यांवरही रामदास आठवले यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले ,तुमची सत्ता आल्यानंतर मतांची चोरी झाल्याचा आरोप आम्ही केला नाही. आमची सत्ता आल्यानंतर तुम्ही सांगता मतचोरी झाली. पण मतचोरी ही आज होते असे नाही. मतचोरी अनेक वर्षांपासून होते, तरी मतचोरी होऊ नये अशी माझी इच्छा असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
आठवले म्हणाले,विरोधकांनी मुंबईत सत्याचा मोर्चा काढला असला, तरी मतदारयाद्या आधीपासून आहेत. काँग्रेसचे सरकार असल्यापासून मतदारयाद्या आहेत. त्यांनी निवजणूक आयोगाकडे तक्रार करावी. राज ठाकरे, उद्धव ठाकरे,शरद पवार व काँग्रेस पक्ष, शेकाप हे सगळे लक्ष एकत्र आले होते. या सर्व मंडळींनी निवडणूक आयोगापुढे .तक्रारी मांडायला हरकत नसल्याचंही आठवले यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.