Kolhapur News : संभाजीराजे छत्रपती यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून झळकले पोस्टर; राजकीय चर्चांना उधाण

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
sambhajiraje Chhatrapati cm banner
sambhajiraje Chhatrapati cm bannerSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : स्वराज्य पक्ष संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांचा आज रविवारी ( 11 फेब्रुवारी ) वाढदिवस आहे. हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मुंबई, नाशिक,पुणे, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणावरून स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात विविध कार्यक्रम भरवले आहेत.

sambhajiraje Chhatrapati cm banner
Sambhaji Raje's Big Statement : संभाजीराजेचं सूचक अन्‌ मोठे विधान, ‘आता माझं महाराष्ट्रापेक्षा देशावर लक्ष’

त्यातच नाशिकहून कोल्हापुरात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या कारवर लावलेले पोस्टर चर्चेत आले आहेत. या कार्यकर्त्यांनी कारवर संभाजीराजे छत्रपती 'भावी मुख्यमंत्री' असं पोस्टर लावले आहेत. या पोस्टरची राजकीय वर्तुळात आणि कोल्हापुरात चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'सध्या सत्ताधारी आणि विरोधकांवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या परिस्थितीत एक विश्वासाचा चेहरा म्हणून आम्ही संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे पाहतो. त्यांना मुख्यमंत्री पदावर बसताना आम्हा नाशिककरांना पाहायचे आहे,' अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

sambhajiraje Chhatrapati cm banner
Tasgaon Assembly Constituency : तासगावात दोन ज्युनिअर पाटील भिडणार ; संघर्षाचा वारसा रोहित आणि प्रभाकर यांच्यात...

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच, वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात 'स्वराज्य केसरी' ही कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली आहे. त्यासाठी देश-विदेशनातून कुस्तीपटू कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

sambhajiraje Chhatrapati cm banner
Devendra Fadnavis : फडणवीसांसाठी कोण बनलंय जग्गा जासूस?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com