Maratha Reservation News : 'आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं...' कराडला मराठा समाजाचा विराट मोर्चा

Karad Maratha Morcha मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, यासाठी कराड येथे आज सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
Maratha Morcha Karad
Maratha Morcha Karadsarkarnama
Published on: 
Updated on: 

-हेमंत पवार

Karad Maratha Morcha News : 'एक मराठा लाख मराठा... कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय ... आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,' या ना अशा अनेक घोषणा देत कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला.

मराठा समाजाला Maratha Reservation आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, यासाठी कराड येथे आज सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने कराड तहसील कार्यालयावर मोर्चा Karad Morcha काढण्यात आला.

त्यासाठी शहरासह गावोगावी जनजागृती करून मोर्चाची जय्यत तयारी केली. त्यामुळे कराड शहरासह गावागावांतील आबालवृद्ध हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. आज सकाळी कराडच्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. तत्पूर्वी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

मनोज जरांगे पाटलांची तब्येत पूर्णपणे खालावली असून, त्यांच्यावर तातडीने उपाचाराची गरज आहे. पण, आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणतेही उपचार घेण्यास जरांगे पाटलांनी नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी सातारचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज जाणार आहे. दुपारी ते साताऱ्यातून निघणार आहेत. maharashtra Political News

Maratha Morcha Karad
Satara News : प्रतापगडला मिळणार गतवैभव; दहा कोटींचा विशेष आराखडा : जितेंद्र डुडी

'एक मराठा लाख मराठा... कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय ... आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,' या ना अनेक अशा घोषणा देत कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला.

Edited By : Umesh Bambare

Maratha Morcha Karad
Maratha Reservation : जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ विहितगावला सर्व पक्ष आले एकत्र!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.