Radhanagari Politics : महायुतीत फूट! पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच महायुतीचा डाव फसणार; के. पी पाटलांच्या संकेताने गणित बिघडणार!
Kolhapur Politics : राज्यात महायुती अस्तित्वात आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत चार गट झाले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून शिवसेना आणि ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या विरोधात लढत झाली. पण राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये लोकसभेला एकत्र असणारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार के पी पाटील हे विधानसभा निवडणुकीला एकमेकांच्या विरोधात लढले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीशी बंडखोरी केलेले माजी आमदार के पी पाटील हे पुन्हा राष्ट्रवादीत आले. त्यामुळे महायुतीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढल्या जातील, अशी आशा असताना पुन्हा एकदा माजी आमदार के पी पाटील यांनी बंडाची भाषा केल्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा महायुतीचे गणित फिस्कटणार आहे.
माजी आमदार के पी पाटील यांनी बंडाची भाषा केल्याने ही निवडणूक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. यांनीच त्याबाबतची घोषणा करून महायुतीचा डाव पलटवला आहे. वारंवार सोयीस्कर भूमिका घेत माजी आमदार के पी पाटील यांनी बंडखोरीची भाषा केल्याने महायुतीत त्यांच्या बाबत नाराजी आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच रंगलेल्या मानापमानाच्या खेळाने नेत्यांची डोकेदखी वाढली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी आपल्या कार्यकत्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे. त्यात विधानसभा निवडणुकीला एकमेकांच्या विरोधात टाकलेले पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार के पी पाटील यांच्यातील संघर्ष अधिक उफाळून आला आहे. दोघेही महायुतीत असले तरी माजी आमदार के पी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी देण्याचा शब्द दिला होता. तर पुन्हा महायुतीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यांच्या भावना आणखीच दुखावल्या आहेत. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी मिळणार का नाही? या मनस्थित असताना के. पी पाटील यांनी पुन्हा बंडखोरीची भाषा केली.
के पी पाटील नेमके काय म्हणाले?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सन्माननीय तोडगा निघत असेल, तरच आम्ही युतीबरोबर अन्यथा कार्यकर्ते सांगतील ती आमची दिशा असेल. काही झाले तरी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी टोकाची भूमिका जाहीर करून के. पी. पाटील यांनी वादाला बत्ती दिली आहे.
अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर
के. पी पाटील हे मुश्रीफांना मानणारे आहे. आधीच पालकमंत्री न मिळाल्याने मुश्रीफ गटात आबिटकर गतविरोधात अंतर्गत नाराजी आहे. दोन मंत्र्यामध्ये धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. ती एवढ्या टोकाला गेली आहे की, शासकीय विश्रामगृहाच्या भुदरगड या कक्षावर अधिकार कोणाचा, यावरून दोन गटातील संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे. यावरच के पी पाटील यांनी कित्ता गिरवत बंडखोरीची भाषा केली आहे. अर्थ राजकीय वैर असले तरी आतापासूनच महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.