Satara Politic's : आमदार अतुल भोसलेंकडून जयकुमार गोरेंच्या भूमिकेला खो; जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत घेतली मोठी भूमिका...

Jaykumar Gore Vs Atul Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत. जयकुमार गोरे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वबळाचा संकेत दिला, तर अतुल भोसले यांनी सर्वांना सोबत घेण्याची भूमिका मांडली.
Atul Bhosale-Jaykumar Gore
Atul Bhosale-Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Satara, 03 September : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक भाजप सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मांडली आहे.

सर्वांना सोबत घेऊन सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक सलोख्याने लढण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे, असे आमदार भोसले यांनी स्पष्ट केले, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरून सातारा भाजपत दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर झाली आहे. त्यावर आलेल्या आक्षेपांवर २ सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली आहे. एकीकडे प्रशासकीय तयारी सुरू असताना राजकीय घडामोडींना जोरात घडताना दिसत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने खुद्द भाजपमध्येच दोन मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत. बॅंकेचे सर्वाधिक मतदार असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले आहे.

Atul Bhosale-Jaykumar Gore
NCP-Shivsena Clash : राजकीय संघर्ष पेटला! खालापूरच्या आंदोलनाला वेगळे वळण, राष्ट्रवादीविरोधात शिंदेंचा आमदार आक्रमक

गोरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर मंत्री शिवेंद्रराजेंनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढण्याबाबतचे भाष्य केले आहे.

ते म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार एकोप्याने काम करत असताना सातारा जिल्ह्यातही त्याच धर्तीवर तीनही पक्षांमध्ये समन्वय ठेवून पुढे जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. कोणालाही बाजूला ठेवून निवडणूक लढविण्याऐवजी सर्वांना सोबत घेऊन सलोख्याने निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न राहील.

Atul Bhosale-Jaykumar Gore
Raigad Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, कर्जत-खालापूर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले; तटकरेंची फडणवीसांना 'फोनाफोनी'

सातारा जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय राहावा, यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून आपण सातत्याने प्रयत्नशील आहे. राजकारणात मतभेद होतात. पण, महायुतीच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा पक्षपातळीवर प्रयत्न आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही हाच समन्वय कायम ठेवण्याची भूमिका आहे, असे आमदार भोसले यांनी सांगितले.

आमदार भोसले यांची भूमिका मंत्री गोरे यांच्या घोषणेला छेद देणारी ठरत आहे. भोसले यांनी सर्वसमावेश राजकारणाची भूमिका मांडली आहे. मात्र गोरे हे एकला चलोच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे पक्षीय पातळीवर कोणता निर्णय होतो, हे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com