रोहित पवारांनी दाखविले गुजरातचे ड्रग्ज मॉडेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत असल्याची आकडेवारीच ट्विटरवर टाकून भाजप ( BJP ) नेत्यांची कोंडी केली आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन ठेवण्याचा निर्णय घेतला यावर भाजप नेत्यांकडून टीका होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडत असल्याची आकडेवारीच ट्विटरवर टाकून भाजप ( BJP ) नेत्यांची कोंडी केली आहे. ( Rohit Pawar showed the drug model of Gujarat )

आमदार रोहित पवार यांनी गुजरातमध्ये सप्टेंबर, नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यांत सापडलेल्या ड्रग्जची आकडेवारी देत भाजप नेत्यांवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, यातलं 1 टक्के ड्रग्स जरी महाराष्ट्रात सापडलं असतं तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,या मागणीसाठी राज्यातल्या काही भाजप नेत्यांनी तर राजभवनावर मुक्कामच ठोकला असता.

Rohit Pawar
आमदार रोहित पवार जेव्हा गेले नगर महापालिकेत...

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, केवळ बिगर भाजपशासित राज्यात थोडं जरी ड्रग्स सापडलं तरी आकांडतांडव करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी भाजपशासित राज्यात सापडणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या ड्रग्सवरही बोललं पाहिजे. कारण युवांच्या सुरक्षित भवितव्यासाठी ड्रग्स या विषयाकडं राजकारणापलीकडं जाऊन पाहण्याची गरज आहे, असे म्हणत त्यांनी गुजरातचे ड्रग्ज मॉडेलच समाजासमोर उभे केले आहे.

Rohit Pawar
रोहित पवार यांच्या कष्टाचे अजितदादांकडून कौतुक, पाहा व्हिडिओ

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र व मुंबईतील ड्रग्ज संदर्भात टीका केली होती. वाईनच्या निर्णयानंतरही टीका करण्यात आली. मात्र भाजप विकासाचे मॉडेल म्हणून ज्या गुजरातला दाखविते त्याच गुजरातच्या ड्रग्ज मॉडेलवर रोहित पवार यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com