

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आजच्या राजकारणावर तीव्र शब्दांत टीका करणारी पोस्ट केली आहे.
राजकारणात नैतिकता उरली आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विचारमंथन घडवून आणले आहे.
Rohit Pawar Disgusting Politics Statement : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे मागच्या आठवड्यात 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. या घटनेनं पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह राज्याला मोठा धक्का लागला आहे. अजित पवार खासगी चार्टर्ड विमानाने बारामतीला येत होते. हे विमान विमानतळावर लँडिंगच्या काही मिनिटं आधी धावपट्टीच्या अंतरावर कोसळलं. ज्यात त्यांच्यासह सर्वच्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.
या गोष्टीला आता आठवडा सुद्धा उलटलेला नसताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासह अजितदादा हयात असताना काय चर्चा झाली? कोणासोबत ते बोलले होते? कोणाला काय सांगितलेलं? यावरून बरेच दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मन खिन्न करुन सोडणारी पोस्ट केली आहे. त्यांनी, “आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय, माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यासह दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दररोज राजकारणात वेगाने घडामोडी घडत असून नुकताच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरणाच्या चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार गटाचे नेते दादा हयात असतानाच विलीनीकरणाची चर्चा झाली होती असा दावा करत आहेत. तर हा दावा अजित पवार गटाचे नेते खोडून काढत आहेत.
या सगळ्या चर्चांच्या दरम्यान आमदार रोहित पवार यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणापुढे माणसाच्या जिवाची किंमत शून्य झाली आहे’, अशा शब्दात त्यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी, अजित पवार यांच्या निधनामुळे जोरदार धक्का बसल्यानंतर हा काळ शोक आणि आत्मचिंतनाचा आहे. तेरा दिवस राजकारणावर कोणतेही भाष्य करणार नाही. पण ०९ तारखेनंतर यावर भाष्य करेन असे म्हणाले होते. यानंतर आता त्यांनी केलेल्या पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये, राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद झाले असून राजकारणापुढं माणसाच्या जिवाची किंमत अक्षरश: शून्य झालीय. छक्के – पंजे करता येणं हाच राजकारणचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरचं राजकारणात रहावं का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही”, अशा शब्दात रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच त्यांनी २ तारखेला देखील अशीच एक पोस्ट करत माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा मा. अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. मा. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती. पण आज दादाच आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं हे आपल्या सर्वांवरच आभाळ कोळसल्यासारखं आहे आणि अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य वाटत नाही.
त्यामुळं पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोचेल आणि त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तूर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे…असे म्हटले होते.
1. रोहित पवार यांनी नेमकी कोणती पोस्ट केली आहे?
आजचं राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद झालं असल्याची भावना त्यांनी पोस्टमधून व्यक्त केली आहे.
2. ही पोस्ट कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आली?
अजित पवारांच्या निधनानंतर सुरू असलेल्या राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर.
3. रोहित पवारांनी कोणावर थेट टीका केली आहे का?
नाही, त्यांनी कोणाचं नाव न घेता आजच्या राजकारणावर एकूणच टीका केली आहे.
4. या पोस्टमुळे कोणती चर्चा सुरू झाली आहे?
राजकारणातील नैतिकता आणि माणसाच्या जीवाच्या किमतीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
5. या पोस्टचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद अधिक ठळक होण्याची आणि जनतेत सहानुभूतीची चर्चा वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.