
Rupali Chakankar News : मंत्रिपदापासून वंचित राहिलेले छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. काल (गुरुवारी) एका मुलाखतीमध्ये भुजबळ यांनी पक्षाकडून समीर आणि पंकज भुजबळ यांच्याशी संपर्क साधला होता मात्र आपण संपर्कात नाही, असे सांगितले होते. मात्र, छगन भुजबळ हे पक्षाच्या संपर्कात असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
त्या म्हणाल्या, मी स्वतः समीरदादा भुजबळ यांच्या संपर्कात आहे. तर, राज्याचे प्रांताध्यक्ष छगन भुजबळसाहेब यांच्या संपर्कात आहेत. मात्र अजितदादा यांच्या विरोधातील आंदोलनाचा निषेध करते.
खातेवाटपाबाबत तसेच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजीचे वातावरण असल्याच्या वृत्तावर रुपाली चाकणकर म्हणाल्या, खातेवाटप करताना संख्या मोठी आहे. सर्व काही योग्य होईल अशी बातमी देखील समोर येईल. नेते सहजासहजी नाही तर मोठ्या कष्टाने निवडून येतात. त्यांच्या कष्टामागे कार्यकर्त्यांचा मोठा हात असतो. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होत असतात.
विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे मात्र रुपाली चाकणकर यावरून विरोधकांची खिल्ली उठवली. विरोधकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जनतेने दिलेला कौल विरोधकांनी मान्य करायला पाहिजे. पुढील पाच वर्षे आता त्यांना केवळ विरोध करणे इतकेच काम आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
विधान परिषदेवर आपले निवड केली जाणार का या प्रश्नावरून बोलताना, चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानपरिषद हा माझा विषय नाही. मला पक्षाने पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. विरोधक प्रयत्न करतात की महायुतीत काहीतरी होईल, पण असं काही होणार नाही.महायुती असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी कायम राहिली आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.