Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांचा महायुती मंत्र्यांवरच खळबळजनक आरोप; म्हणाले, ‘संचालक, चेअरमन, बॅंक प्रमुखासह सहकारमंत्र्यांनीही जागा वाटून घेतल्या’

Sangli District Cooperative Bank Recruitment : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती प्रक्रियेत 559 जागा वाटप झाल्याचा गंभीर आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. सहकार मंत्री आणि बँक संचालक मंडळावर थेट निशाणा साधला.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on
  1. आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ५५९ जागांची वाटणी सहकार मंत्री आणि संचालक मंडळाने आपापसांत केल्याचा गंभीर आरोप केला.

  2. खोत यांनी या भरतीविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असून, भरती थांबली नाही तर सहकार मंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर उपोषणाचा इशारा दिला.

  3. त्यांनी जातीनिहाय आरक्षण पाळण्याची व कर्तबगार तरुणांना न्याय देण्याची मागणी केली.

Sangli, 05 October : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील नोकरभरतीवरून रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ, चेअरमन, बॅंकेचा प्रमुख आणि खुद्द सहकारमंत्र्यांनी नोकरभरतीच्या 559 जागा वाटप करून घेतल्या आहेत, असा खळबळजनक आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील या नोकरभरती विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहेत, तरीही नोकरभरती सुरू राहिल्यास सहकारमंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर उपोषण करण्याचा इशाराही सदाभाऊ खोतांनी (Sadabhau Khot) दिला आहे.

आमदार खोत म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (Sangli District Cooperative Bank) सहकार आयुक्तांनी नोकरभरती करण्यास परवानगी दिलेली आहे. बॅंकेत 559 जागांची भरती केली जाणार आहे. यापूर्वी झालेल्या नोकरभरतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. त्या गैरव्यहाराची चौकशी पूर्ण झाली आहे. आता पुन्हा एकदा चौकशी प्रलंबित असताना नव्याने नोकरभरती करण्यास सहकार आयुक्तांनी परवानगी दिलेली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत करावयाच्या नोकरभरतीच्या जागा संचालक मंडळ, बॅंकेचे चेअरमन, सर्वांना सपोर्ट करणारा बॅंकेचा प्रमुख या सर्वांनी वाटून घेतलेल्या आहेत. यात कोणाला शंभर, कोणाला पन्नास, वीस आणि पंचवीस अशा जागा वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सहकार मंत्री यांनाही काही जागा देण्यात आलेल्या आहेत. राज्याचे सहकार मंत्रीसुद्धा वाहत्या गंगेत आपलं घोडं न्हाऊन काढत आहेत. हे अयोग्य आहे. त्याविरोधात आम्ही राज्य सरकार, सहकार विभागाकडे निश्चितपणे दाद मागणार आहोत, असेही खोत यांनी नमूद केले.

Sadabhau Khot
Ramdas Kadam Vs Anil Parab : पत्नीचा उल्लेख करताच कदमांनी परबांचा इतिहासच काढला; ‘बिल्डरकडून मर्सिडीज, प्रेमनगर अन्‌ विर्लेपार्ले SRA मध्ये किती कोटी घेतले?

आमदार खोत म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत नोकरभरती करताना जातीनिहाय करायला पाहिजे होती. ओबीसी किती देणार, ओपनला किती ठेवणार, मागासर्वीयांसाठी किती जागा ठेवणार आहात. या नोकरभरतीत प्रत्येक प्रवर्गाला संधी मिळाली पाहिजे. कारण, बॅंकेच्या जवळपास सहाशे जागा आहेत. चांगली शिकलेली मुलं बॅंकेत येणे गरजेचे आहे.

बॅंकेची चौकशी सुरू असताना कोट्यवधींचा मलिदा लाटण्यासाठी या बॅंकेला नोकरभरतीची परवानगी दिलेली आहे. निश्चितपणाने हे अयोग्य आहे. या नोकरभरतीत असंच घोडं दामटण्याचा प्रकार केला तर सहकारमंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर या विरोधात मी स्वतः उपोषणाला बसणार आहे.

राज्यातील तरुणाना नोकरीची संधी निश्चितपणे मिळायला पाहिजे. पुढाऱ्यांनी पैसे खाऊन जवळचे बगलबच्चे बॅंकेत भरण्यापेक्षा कर्तबगार तरुणांना या बॅंकेत नोकरी मिळणे गरजेचे आहे, अशी आमची भूमिका आहे, असेही सदाभाऊंनी सांगितले.

Sadabhau Khot
Amit Shah : देवेंद्रजी, एकनाथ शिंदे और अजितदादा बनिया नही है; लेकीन बनियासे पक्के है : अमित शाह यांनी घेतली फिरकी

प्रश्न 1 : सदाभाऊ खोत यांनी कोणावर आरोप केले?
सहकार मंत्री, बँकेचे चेअरमन व संचालक मंडळावर.

प्रश्न 2 : किती जागांच्या भरतीवर वाद निर्माण झाला?
५५९ जागांवर.

प्रश्न 3 : खोत यांनी पुढील काय भूमिका घेतली?
कोर्टात जाणे आणि उपोषणाचा इशारा दिला.

प्रश्न 4 : खोत यांची मुख्य मागणी काय आहे?
भरती जातीनिहाय करून पात्र तरुणांना संधी द्यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com