Phaltan News : साधूच्या हत्‍येचा निषेध; फलटणमध्‍ये जैन समाजाचा मूक मोर्चा

Jain Community समाजातील शेकडो स्त्री- पुरुष, तरुणांनी आज सकाळी फलटण शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चाने अधिकार गृह इमारतीसमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या व निवेदन दिले.
Jain Community Morcha
Jain Community Morchasarkarnama
Published on
Updated on

-किरण बोळे

Phaltan News : कर्नाटकात दिगंबर जैन साधूच्या निर्घृण हत्येचा निषेध करीत, या घटनेचा केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत शोध घेऊन गुन्हेगारांना कडक शासन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन फलटणमधील जैन समाजाने मूक मोर्चाद्वारे येथील महसूल अधिकाऱ्यांना दिले.

चिकोडी गावानजीक उभारण्यात येत असलेल्या जैन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जैन आचार्य श्री १०८ कामकुमार नंदीजी महाराज यांची पाच जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या समाज विघातक कृत्याचा फलटणमधील Phaltan सकल जैन समाजातर्फे Jain Community जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

समाजातील शेकडो स्त्री- पुरुष, तरुणांनी आज सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चाने अधिकार गृह इमारतीसमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या व निवेदन दिले. जैन समाजाच्या ट्रस्ट, देवस्थान आणि धर्मगुरूंना कायदेशीर मार्गाने पोलिस संरक्षण देण्यासाठी केंद्र, राज्य शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

त्याशिवाय जैन धर्मगुरूंच्या प्रवासादरम्यान रस्त्यात असलेल्या शाळा, महाविद्यालयांत वास्तव्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. त्याबाबत शिक्षण खात्याने नियमात आवश्यक बदल करून संबंधितांना योग्य सूचना तत्काळ द्याव्यात. जैन धर्मगुरू पायी विहार करीत असताना समाजकंटकाकडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत.

Jain Community Morcha
Satara NCP News : शरद पवारांची साथ सोडून मकरंद पाटील अजितदादा गटात...

गेल्या पाच वर्षांमध्ये हजारो जैन साधू बळी ठरल्याने साधूंना पोलिस संरक्षण मिळावे. ही घटना नियोजनपूर्वक कट आखून करण्यात आल्याने यात सामील असणाऱ्या संशयितांना त्वरित शोधून त्यांच्याविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा. या घटनेचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केला जावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. हे निवेदन पुरवठा निरीक्षक शिवाजी जगताप व रोहयोचे अव्वल कारकून मनोज काकडे यांनी स्वीकारले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com