Sambhaji Bhide
Sambhaji BhideSarkarnama

Shivsena Mahaadhiveshan : शिवसेना महाअधिवेशनात संभाजी भिडेंची एन्ट्री; काय म्हणाले...

Political News: अधिवेशनस्थळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी भेट दिली. त्यांच्या या भेटीची चर्चा सध्या कोल्हापुरात रंगली आहे.
Published on

Kolhapur News: शिंदे गट शिवसेनेच्या महाअधिवेशनास कोल्हापूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनास राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत, पण अधिवेशनस्थळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी भेट दिली. त्यांच्या या भेटीची चर्चा सध्या कोल्हापुरात रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पहिलं महाअधिवेशन कोल्हापुरात होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित आहेत; पण एक व्यक्तीची उपस्थितीने सर्वांच्या भुवया उंचावल्या. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी अधिवेशनस्थळी भेट दिली.

Sambhaji Bhide
Ajit Pawar Baramati Rally : 'पक्ष चोरला नाही, रितसर मिळाला'; अजितदादांचा बारामतीत एल्गार...

या वेळी त्यांनी आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्याशी पाच ते दहा मिनिटे चर्चा केली. आजच्या अधिवेशनात हिंदुत्व हा विषय घेऊन अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे भिडे यांची उपस्थिती बरेच काही सांगून गेली. थोडा वेळ चर्चा करून भिडे पुन्हा अधिवेशन स्थळावरून बाहेर गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी या अधिवेशनास विशेष निमंत्रित नाही. मात्र, भेटण्यासाठी आलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या (Shivsena ) सर्वच नेत्यांनी आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन या अधिवेशनातून जाणार असून, आपापल्या ठिकाणी जाऊन हिंदुत्वाचे विचार आम्ही जनतेला सांगणार आहोत, असे सांगत हॊते.

R

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide : वंचित, रिपब्लिकन पक्षासह समविचारी पक्षांचा भिडेंना पळवून लावण्याचा प्रयत्न
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com