Sambhajiraje, Jitendra Awhad
Sambhajiraje, Jitendra AwhadSarkarnama

Jitendra Awhad :''मतांसाठी,चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्यं करणं..''; संभाजीराजेंचा आव्हाडांवर हल्लाबोल

Maharashtra Politics : '' जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले...''
Published on

Sambhajiraje News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड हे काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे अडचणीत आले होते. भाजपकडून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला होता. यावरुन निर्माण झालेला वाद थांबत नाही तोच त्यांनी पुन्हा एकदा रावण आणि श्रीराम यांच्याबाबत ट्वीट केलं आहे. यानंतर ते पुन्हा भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. आता संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje) यांनी देखील आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे.

माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना गंभीर इशारा देखील दिला आहे. राजेंनी यासंदर्भात एक टि्वट केलं आहे. यात जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही संभाजीराजेंनी (Sambhajiraje)आव्हाडांना दिला आहे.

Sambhajiraje, Jitendra Awhad
Kasba By Election : राष्ट्रवादीकडून काटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब अन् कसबा 'बिनविरोध'च्या चर्चांना पूर्णविराम!

जितेंद्र आव्हाड यांच्या त्या टि्वटवरुन वादाची ठिणगी...

आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून महाभारत, रामायण यांच्यासह शिवाजी महाराजांच्या आक्षेपार्ह टिप्पणी केली असल्याचा आरोप भाजपसह व इतरही नेतेमंडळींनी केला आहे. टि्वट करत आव्हाड म्हणाले, रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा असं टि्वट म्हटलं आहेअसं ट्वीट करत आव्हाडांनी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असं हॅशटॅगही दिलं आहे.

Sambhajiraje, Jitendra Awhad
Shivsena News; आदित्य ठाकरेंच्या शक्तीप्रदर्शनाने बंडखोरांना फुटला घाम!

आव्हाडांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस

भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांनी आव्हाडांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहे. अनेक ठिकाणी निदर्शने करून आव्हाडांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. मात्र आव्हाड त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. तर भाजपाकडूनही त्यांच्यावर जोरदार टीका सुरू आहे. त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा भाजपतर्फे करण्यात आली आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपील दहेकर यांनी ही घोषणा केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com