Sangli APMC Trifurcation: त्रिभाजनाचा प्रस्ताव! सांगली बाजार समितीवरून राजकारण तापणार; आता नियमांतून डाव साधणार?

New Proposal Sangli APMC Trifurcation: बाजार समितीचे विभाजन करून सांगली जत आणि कवठेमंकाळ असं त्रिभाजन करण्यासाठी स्वतंत्र उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक आणि संचालकांकडे पाठवला आहे.
 Sangli APMC Trifurcation
Sangli APMC TrifurcationSarkarnama
Published on
Updated on

Sangli APMC Trifurcation Latest News : राज्य सरकारने एप्रिल 2026 मध्ये सांगली बाजार समितीचे मिरज,जत आणि कवठेमंहकाळ या तीन भागात विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी न्यायालयीन लढा देत हा निर्णय रद्द ठरवला होता.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय रान पेटले होते. त्यामुळे तब्बल कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची लढाई ही महाविकास आघाडीच्या नेत्याने जिंकली होती. पुन्हा एकदा या बाजार समितीवर सभापती आनंदराव नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पुन्हा महाविकास आघाडी सरकारला सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या मुद्द्याला सामोरे जावे लागणार आहे.

बाजार समितीचे विभाजन करून सांगली जत आणि कवठेमंकाळ असं त्रिभाजन करण्यासाठी स्वतंत्र उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक आणि संचालकांकडे पाठवला आहे. यावर सभापती आणि संचालकांचा अभिप्राय 9 सप्टेंबर पर्यंत मागवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण या निमित्ताने तापणार आहे. सभापती आणि सत्ताधारी संचालकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा विरोधात दिला आहे.

 Sangli APMC Trifurcation
Shirol MIDC Protest: एमआयडीसीला विरोध! तहसीलदार कार्यालयाचे गेट-काचा फोडल्या; शिरोळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

यापूर्वी घेतलेल्या त्रिभाजनाच्या प्रस्तावावर सर्किट बँकेकडून कायदेशीर प्रक्रिया राबवून आदेश पारित केलेल्या नुसार उपनिबंधकांनी हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार 31 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे विभाजनाबाबत अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यानुसार बाजार समितीने 10 ऑगस्ट रोजी आपला अभिप्राय सादर केला आहे. त्यामुळे 11 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडे पाठवण्यात आला आहे. सांगली बाजार समितीच्या या त्रिभजनामुळे कर्मचारी वर्गाचे ही विभाजन होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 Sangli APMC Trifurcation
PMC News: मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अन् मुरलीधर मोहोळांची पालिकेत एन्ट्री; नाराज भाजप नगरसेवकांची घेणार ‘शाळा’

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदराव नलावडे या प्रक्रियेवर संताप व्यक्त करत संचालकांची मुदत संपेपर्यंत याबाबत निर्णय घेऊ नये असा अभिप्राय आम्ही जिल्हा उपनिबंधाकांकडे दिला आहे. जर त्यासंदर्भात विभाजन झाले तर आम्ही न्यायालयीन लढा देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com