Sangali Congress News : सांगलीतील स्नेहभोजनावरुन पटोलेंचे घुमजाव; म्हणाले, विशाल पाटलांना आतून पाठींबा होता काय..

Nana Patole स्नेहभोजनास विशाल पाटील व विश्वजित कदम उपस्थित राहिल्याच्या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, त्यांची भाऊबंधकी असल्यामुळे ते या स्नेहभोजनाला आले असतील.
Vishal Patil, Nana Patole, Vishwajit Kadam
Vishal Patil, Nana Patole, Vishwajit Kadamsarkarnama

Sangali Congress News : सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी सुध्दा हजेरी लावली होती. यावरुन उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असुन त्यांच्या जिल्हा प्रमुखाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सांगलीतील सर्व सीटा पाडू, असा इशारा दिला आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंनी मात्र, घुमजाव करत सांगलीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पंजा नव्हताच. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा विशाल पाटलांना आतून पाठींबा होता काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सांगलीतील काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला बंडखोर विशाल पाटील, विश्वजित कदम हे आल्याने राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर यावर ठाकरे गट आक्रमक झाला असुन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी म्हटले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सांगलीतील सर्व विधानसभा सीटा पाडू.

यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, हे सर्व जनतेच्या हातात असते नेत्यांच्या नाही. त्यामुळे जनता ठरवेल. सांगलीत पाणीटंचाई आहे त्यावर बोलायला पाहिजे, अशा टोला पटोले यांनी लगावला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल असल्याचे दिसुन येत आहे.

Vishal Patil, Nana Patole, Vishwajit Kadam
Sangali Politics: काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक

स्नेहभोजनास विशाल पाटील व विश्वजित कदम उपस्थित राहिल्याच्या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात आपसी संबंध असतात. विशाल पाटील, विश्वजित कदम यांची भाऊबंधकी आहे. त्यामुळे ते या स्नेहभोजनाला आले असतील. सांगलीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पंजा नव्हताच. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा विशाल पाटलांना आतून पाठींबा होता काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

काँग्रेस सत्तेवर आल्यावर आरक्षणाचे प्रश्न मिटतील....

उच्च न्यायालयाने मुस्लिमांचे ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. 2010 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने मुस्लिम जातींना ओबीसी प्रवर्गात दर्जा दिला होता. मात्र, आता कोलकाता उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना करावी, असे बोलले आहेत. त्या आधारावर जातीनिहाय जनगणना झाली तर प्रश्न निघू शकतात. तेथील राज्यकर्ते न्याय मागायला कुठे पण जाऊ शकतात. जेव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येइल तेव्हा सर्व प्रश्न निकाली निघतील.

Edited By : Umesh Bambare

Vishal Patil, Nana Patole, Vishwajit Kadam
Eknath Shinde Vs Udhav Thackeray : एकनाथ शिंदेंनी दिली उद्धव ठाकरेंना रंग बदलणाऱ्या सरड्याची उपमा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com