

Gopichand Padalkar News : सांगली जिल्हा बँकेसाठी आज मतदान पार पडत आहे. 21 जागा असलेल्या या बँकेतील 15 जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, सहा जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये जत गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांचा कस लागणार आहे. जत गटात पडळकर विरुद्ध विनोद पवार यांच्यात मुख्य लढत होत आहे.
तासगाव गटात देखील माजी खासदार संजयकाका पाटील विरुद्ध माजी आमदार सुमन आर पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. माजी आमदार विरुद्ध माजी खासदार यांच्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे लक्ष असणार आहे. तीन नोव्हेंबरला या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रांवर मतदान पार पडते आहे.
कवठेमहांकाळ विकास सोसायटी गटातून माजी राज्यमंत्री अजित घोरपडे आणि तानाजी पाटील यांच्यात लढत होत आहे. मिरजेत आण्णासाहेब कोरे- अनिल शेगुणशी यांच्यात लढत होत आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज १२ जागांवर मतदान होत आहे. या निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २१ जागांपैकी ९ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १२ जागांसाठी आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे.
सातार जिल्हा बँकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि त्यांचे बंधू शेखर गोरे, रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर विरुद्ध माजी खासदार निंबाळकर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.