Sangli Bank Result : मतमोजणीपूर्वीच पडळकर विजयी? जिल्हा बँकेसमोर लावलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण

Gopichand Padalkar victory banner : सांगली जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल पडळकर यांचे अभिनंदन करणारे फलक थेट बँकेच्या मुख्यालयासमोरील चौकात लावण्यात आले आहेत. त्यामुळे निकालाआधीच पडळकर समर्थकांचा आत्मविश्वास चर्चेचा विषय ठरत आहे.
Gopichand Padalkar | Sangli Bank Election | Result
Gopichand Padalkar | Sangli Bank Election | ResultSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News, 03 Nov : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाचे बॅनर सांगली शहरात झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल पडळकर यांचे अभिनंदन करणारे फलक थेट बँकेच्या मुख्यालयासमोरील चौकात लावण्यात आले आहेत. त्यामुळे निकालाआधीच पडळकर समर्थकांचा आत्मविश्वास चर्चेचा विषय ठरत आहे.

आमदार गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या उमेदवारी आणि अर्जासंदर्भातील प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले होते. या प्रकरणाची चर्चा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याने त्यांच्या उमेदवारीकडे केवळ जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते. आता निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचे संकेत देणारे बॅनर लावल्याने या निवडणुकीतील उत्सुकता आणखी वाढली आहे.

Gopichand Padalkar | Sangli Bank Election | Result
Gokul Chairman Election : सतेज पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीचा मास्टर प्लॅन; मंत्रिमंडळाच्या बैठकीत आजच 'तो' वटहुकूम निघणार?

उमेदवारी अर्जावरून न्यायालयीन लढाई

पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावरून सुरुवातीपासूनच वाद निर्माण झाला होता. जत सोसायटी गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पडळकर यांच्या सभासदत्वासह निवडणूक लढवण्याच्या पात्रतेवर याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने पडळकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत पडळकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. या न्यायालयीन लढाईमुळे पडळकर यांच्या उमेदवारीची राज्यभर चर्चा झाली होती. अशातच आता निकाल जाहीर होण्यापूर्वीच सांगलीतील जिल्हा बँक चौकात पडळकर यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत.

Gopichand Padalkar | Sangli Bank Election | Result
Aaishvary Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची मोठी फसवणूक : मोबाईलवर मेसेज आला अन् थेट परदेशातून...

पडळकरांचे खंदे समर्थक आणि भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघमोडे यांनी हे फलक लावले आहेत. त्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचे अभिनंदन, असा मजकूर आहे. या अभिनंदनाच्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.