

Sangli News: भाजप आमदारांनी लक्ष्य केलेल्या व नोकर भरतीच्या मुद्द्यांवरून राज्यात गाजलेल्या सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी (ता.22) जाहीर करण्यात आला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना रंगण्याची शक्यता असून 1 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती आणि विविध विषयांवरून भाजपने निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मिती केली होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी बँकेच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक यंदा गाजण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी व्यूहरचना आखली असून भाजपच्या नाराजांना गळाला लावण्याचा डाव आखला आहे.
अशातच ही निवडणूक महायुती म्हणून लढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतीच त्यासंदर्भात कोल्हापुरात भाजपच्या काही नेतेमंडळाची चर्चा झाली.
आता प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून एक नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून तीन नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
* उमेदवारी अर्ज - 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर
* छाननी 5 ऑक्टोबर
* माघार 6 ते 21 ऑक्टोबर
* चिन्ह वाटप - 22 ऑक्टोबर
* मतदान 1 नोव्हेंबर
* मतमोजणी 3 नोव्हेंबर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.