Sangli Loksabha Election 2024 Result : संजयकाका की विशाल पाटील? आज फैसला, धाकधूक वाढली

Loksabha Election 2024 : विजयाचा गुलाल आपल्याला लागावा, यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले आहेत. निकालाला अवघे काही तास उरल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Chadrahar Patil, Vishal Patil, Sanjay Patil
Chadrahar Patil, Vishal Patil, Sanjay PatilSarkarnama

Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता.4) होत असून अटीतटीची लढत झालेल्या निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील की अपक्ष विशाल पाटील बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याशिवाय महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह 20 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. विजयाचा गुलाल आपल्याला लागावा, यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले आहेत. निकालाला अवघे काही तास उरल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले. सांगलीसाठी 62.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तब्बल 26 दिवसांनंतर मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी आणि अपक्षांसह 20 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

तरी खरी लढत ही भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे बंडखारे व अपक्ष उमेदवार विशाल पाटील या दोन उमेदवारातच झाली, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु महाविकास आघाडीतील फुटीमुळे ठाकरे गटाची निवडणुकीत कोंडी झाली होती.

यंदा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेने (उबाठा) कोल्हापुरची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली. सांगली लोकसभेची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वासात देखील घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. ही निवडणूक काँग्रेस प्रेमी व दादा घराण्याच्या अस्तित्वाची राहिली. माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांच्यासह जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांचीही विशाल यांनाच छुपी मदत झाली असल्याची चर्चा आहे.

Chadrahar Patil, Vishal Patil, Sanjay Patil
Hingoli Lok Sabha News : आलटून पालटून खासदार देणारे हिंगोलीकर आता कोणाला देणार दिल्लीची संधी ?

भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी हॅटट्रिक करण्याचा चंग बांधला, मात्र भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष दिसून आला. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी खासदारांवर आरोप करीत त्यांच्याविरोधात प्रचार केला. त्यामुळे लोकसभेची जागा कायम राखण्यासाठी भाजपच्या नेत्यांना कस लागला होता. अखेरच्या टप्प्यात भाजपने मतदार खेचण्याचा प्रयत्न केला होता.

महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेवून प्रचाराचे रान तापवण्याचा प्रयत्न केला, परंतु महाविकास आघाडीत फूट पडल्याने काँग्रेस नेते उघडपणे कमीच दिसून आले होते, त्यामुळे सेना बॅकफूटवर गेली होती. भाजप, महाविकास आघाडी आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची राहिली. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Chadrahar Patil, Vishal Patil, Sanjay Patil
Gopinath Munde News : भाजपचे धुरंधर नेते गोपीनाथ मुंडेंना 2009 च्या लोकसभा निवडणुकीत फुटला होता घाम

20 उमेदवारांचे भवितव्य ठरणार

सांगली लोकसभेसाठी 20 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते. मात्र खरी लढत भाजपचे संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यातच झाली. याशिवाय सिकंदर पटवेगार (बहुजन समाज पार्टी), आनंद नलगे (बळीराजा पार्टी), महेश खराडे (स्वाभिमानी पक्ष) यांच्यासह अपक्षांचे भवितव्य निकालावर ठरणार आहे, त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असल्याचे चित्र दिसत होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Chadrahar Patil, Vishal Patil, Sanjay Patil
Jogendra Katyare Dismiss: 'लेटरबॉम्ब' अंगलट; खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे बडतर्फ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com