Property Tax Notice : महापालिकेची घरपट्टीसाठी 'म्हसोबा'ला नोटीस, देवाचे पैसे कोण भरणार?

Sangli Municipal Corporation Mhasoba Temple : महापालिकेने नोटीस बजावलेले म्हसोबा मंदिर हे कोणत्याही ट्रस्ट अथवा संस्थेच्या अखत्यारीत नाही. येथे लोक येऊन पूजा करून जात असतात.
 Mhasoba Temple sangli
Mhasoba Temple sanglisarkarnama
Published on
Updated on

Property Tax Notice News : मार्च एन्ड जवळ येत असल्याने स्थानिक स्वराज संस्थाकडून कर वसुलीची सुरुवात करण्यात आली आहे. ठरवलेले टार्गेट पूर्ण करण्याची प्रशासनाची धडपड सुरू आहे. मात्र, या धडपडीत चक्क एका मंदिरालाच महापालिकेने नोटीस बजावल्याचे समोर आले आहे.सांगली महापालिकेकडून म्हसोबा मंदिराला घरपट्टीची नोटीस देण्यात आली आहे.

सांगली शहरातील एका म्हसोबा मंदिराला घरपट्टीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये 1 हजार 62 रुपयांची घरपट्टी भरण्याचे सांगण्यात आले आहे. वाढीव घरपट्टीसाठी सांगली महापालिकेमार्फत नुकताच एक सर्वे करण्यात आला. त्यानुसार शहरातल्या मालमत्तांना वाढीव घरपट्टीची नोटीस बजावली जातीय. मात्र, म्हसोबा मंदिर हे कोणाच्याच नावे नसल्याची माहिती आहे. पालिकेकडून घरपट्टीची नोटीस मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आली. तसेच मालमत्ताधारक म्हणून 'धारक' असे नाव टाकण्यात आले आहे.

 Mhasoba Temple sangli
Shivsena News: इम्तियाज जलील यांचा 'तो' सल्ला ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्या शिंदे अन् त्यांच्या शिलेदारांच्या पचनी पडणार का..?

महापालिकेने नोटीस बजावलेले म्हसोबा मंदिर हे कोणत्याही ट्रस्ट अथवा संस्थेच्या अखत्यारीत नाही. येथे लोक येऊन पूजा करून जात असतात तसेच दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे महापालिकेने कराची जी नोटीस दिली आहे. तो कर कोण भरणार असा प्रश्न उपस्थित झालाय.विशेष म्हणजे पालिकेने मंदिराला दिलेल्या या नोटीशीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सांगली महापालिकेकडून नुकताच वाढीव घरपट्टीसाठी ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात आला आरोप होतो आहे. ज्या सर्व्हेमध्ये नोंदणीकृत नसलेल्या 29 हजार मालमत्तांना नोटीस बजावण्यात आलीये तसेच वाढीव घरपट्टी मान्य नसलेल्यांना तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पालिका काय कारवाई करणार?

म्हसोबा मंदिराचे कोणत्याही ट्रस्ट अथवा संस्थेच्या अखारित्या नाही. त्यामुळे महापालिका कोणाकडून कर वसूल करणार तसेच कर भरला नाही म्हणून म्हसोबा मंदिराची मालमत्ता पालिका जप्त करण्याची कारवाई करणार का? याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

 Mhasoba Temple sangli
Supreme Court News : सगळ्या फायली फेकून देईन, मुंबई हायकोर्टात असे..! न्यायमूर्ती ओक वकिलांवर भडकले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com