Sangli News: सांगली पालिकेची नोकरभरती वादाच्या भोवऱ्यात! 41 पदांवरून महासभा गाजणार

Sangli Municipal Corporation Recruitment: एकूण ८२ रिक्त पदांपैकी ४१ तांत्रिक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासकीय काळात झाला होता. या प्रस्तावावर सभेत सविस्तर चर्चा झाली
sangli miraj kupwad municipal corporation
sangli miraj kupwad municipal corporationsarkarnama
Published on
Updated on

Sangli Job Recruitment: सांगली महापालिकेतील नोकरभरतीचा मुद्दा आता चांगलाच तापण्याची शक्यता आहे. ८२ रिक्त पदांपैकी ४१ तांत्रिक पदांच्या भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सीला काम देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली असून, अंतिम निर्णयासाठी हा विषय १७ सप्टेंबरच्या महासभेत मांडला जाणार आहे. त्यामुळे महासभेत या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

'सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेतील नोकरीभरतीचा वाद येणाऱ्या महासभेत पेटण्याची शक्यता आहे. सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत टाटा कन्सल्टन्सीकडे काम देण्यात आले असून 82 पदापैकी 41 पदे भरली जाणार आहेत. या नोकरभारतीला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली असली तरी हा ठराव अंतिम मान्यतेसाठी १७सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महासभेत या विषयावरून वादळी होण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील एकूण ८२ रिक्त पदांपैकी ४१ तांत्रिक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासकीय काळात झाला होता. या प्रस्तावावर सभेत सविस्तर चर्चा झाली. कंपनीचा प्रति उमेदवार ७९७ रुपये खर्च आणि इतर शासकीय-निमशासकीय संस्थांमधील भरतीचा अनुभव विचारात घेऊन स्थायी समितीने प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. मात्र, प्रशासनाने हा विषय टप्प्याटप्प्याने आणल्यामुळे महासभा विरुद्ध स्थायी समिती असा राजकीय पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क, विसर्जन कुंडांची निर्मिती आणि परिसराच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापतींनी केले. शहर परिसरात वाढलेल्या चिकनच्या गाड्यांवरून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उघड्यावर कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आणि हॉटेल वेस्ट संकलन करणाऱ्या कंपनीने संध्याकाळच्या वेळी कचरा तातडीने उचलण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नगरसेवकाच्या जनरल फंडातील १५ लाख रुपयांच्या निधीतून होणारी उद्याने व इतर विकासकामे (एकूण किंमत सुमारे १८ ते २० कोटी रुपये) यांच्या निविदा प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे निर्देश सभापती माने यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com