Murder Case : सिया-चेतनपेक्षाही डेंजर स्टोरी : लव्ह मॅरेज केलं त्यालाच छातीवर बसून संपवलं

Sangli Murder Case : पतीच्या छाताडावर बसून गळा आवळून प्रियकराच्या मदतीने दारूड्या पतीचा काटा काढणाऱ्या विवाहितेचा धक्कादायक कट विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
murder case
murder caseSarkarnama
Published on
Updated on

Sangli Crime News : येथील पोळ मळा परिसरात आनंद सर्जे (वय २८) याचा झोपेत गळा दाबून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर पत्नी पल्लवी आनंदा सर्जे (वय २२) व प्रियकर दीपक आप्पासाहेब आजमाने (वय २१, बिरनाळे कॉलेजजवळ, सिद्धिविनायक अपार्टमेंट) या दोघांना अटक केली. दोघांना ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली. मृत आनंद हा दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याची दोघांनी कबुली दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत आनंद सर्जे आणि संशयित दीपक आजमाने हे दोघेजण राम मंदिरजवळील एका रेडिमेड कपड्याच्या शोरूममध्ये सेल्समन म्हणून कार्यरत होते. दोघेही जत तालुक्यातील, तसेच दूरचे नातेवाइक असल्यामुळे सर्जे याच्याकडे दीपकचे येणे-जाणे होते.

आनंदला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दारू पिल्यानंतर घरी येऊन पत्नी पल्लवीला सतत त्रास देत होता. त्यांना दोन मुले असून त्यापैकी एक बाळ लहान आहे. आनंदच्या घरी येणे-जाणे असल्यामुळे पल्लवी आणि दीपक यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. दीपक हा पल्लवीला होत असलेला त्रास बघून तिला आधार देत होता.

murder case
Vilas Ghule Murder Case : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट: गुन्ह्यात वापरलेली कार, चाकू SIT कडून जप्त

दरम्यान गुरुवारी (ता. २५) रात्री आनंदा आणि पत्नी यांच्यात वाद झाला. त्यानंतर तो झोपी गेला. तेव्हा पल्लवीने प्रियकर दीपकला बोलवून घेतले. तो आल्यानंतर दोघांनी झोपेत असलेल्या आनंदा याचे हात-पाय ओढणीने बांधून हाताने गळा दाबून खून केला. खुनानंतर पल्लवीने नातेवाइकांना बोलावून पती बेशुद्ध पडल्याचे सांगून ‘सिव्हिल’मध्ये उपचारांस दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान आनंदच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला. त्यामुळे मिरजेत शवविच्छेदन करण्यात आले.

शवविच्छेदनानंतर आनंदच्या नातेवाइकांनी गुड्डापूर येथे गावाकडे अंत्यसंस्कार केले. दरम्यान, मृत आनंदच्या गळ्यावरील ओरखडे पाहून संशय निर्माण झाला होता. त्यामुळे विश्रामबाग पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपास सुरू केला. पत्नी पल्लवी आणि प्रियकर दीपक यांच्याविषयी संशय निर्माण झाला. दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आनंद हा दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.

murder case
Ketan Agrawal Murder Case : सियाचा खोटारडेपणा उघड; आई-वडिलांनीच पोलिसांसमोर मुलीला तोंडावर पाडलं, म्हणाले, "केतनचं स्थळ आणलं तेव्हा..."

बाळासोबत कोठडीत

आनंद सर्जे व पल्लवी यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांना दोन मुले आहेत. त्यापैकी एक बाळ लहान आहे. मोठ्या मुलास नातेवाइकांकडे सोपवले. तर लहान बाळासमवेत पल्लवीची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com