Ketan Agrawal Murder Case : सियाचा खोटारडेपणा उघड; आई-वडिलांनीच पोलिसांसमोर मुलीला तोंडावर पाडलं, म्हणाले, "केतनचं स्थळ आणलं तेव्हा..."

Siya Goyal Statement Twist : पोलीस चौकशीत सिया गोयलने तिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं आणि हे तिने तिच्या घरच्यांना सांगितल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची काल पोलिसांनी चौकशी केली.
Siya Goyal, accused in the Ketan Agrawal murder case
Siya Goyal, accused in the Ketan Agrawal murder case, during police investigation. The latest revelation has brought a new twist to this high-profile Pune crime case.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Jun : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलने पोलिसांना खोटी माहिती सांगितल्याचं आता समोर आलं आहे. शिवाय तिचा खोटारडेपणा तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळेच समोर आला आहे.

पोलीस चौकशीत सिया गोयलने तिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं आणि हे तिने तिच्या घरच्यांना सांगितल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची काल पोलिसांनी चौकशी केली.

यावेळी सियाच्या आई-वडिलांनी, 'केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं असं म्हटलं आहे. शिवाय सियाचा भाऊ साहिल गोयल याने देखील असंच सांगितल्यामुळे आता सियाचा खोटारडेपणा समोर आला आहे.

Siya Goyal, accused in the Ketan Agrawal murder case
Dharashiv Politics : ओम राजेनिंबाळकरांच्या एन्ट्रीने शिवसेनेत असंतोष : जिल्हाप्रमुखाचा 'पक्षाकडून अंतिम निरोपाची वाट पाहतोय' म्हणतं थेट एकनाथ शिंदेंना अल्टिमेटम

काल लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांची तब्बल साडे अकरा तास चौकशी केली. या चौकशी दरम्यान, केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं असं स्पष्ट केलं. शिवाय सिया आणि चेतन मित्र आहेत, याबाबत आम्हाला कसलीही कल्पना नव्हती. सियाने चेतनबद्दल आम्हाला कधीचं काही सांगितलं नव्हतं असंही यावेळी तिच्या आई-वडिलांनी सांगितलं.

Siya Goyal, accused in the Ketan Agrawal murder case
Mukesh Ambani 900 Crore Donation : राम मंदिर देणगीवरून नवा वाद; अंबानींच्या 900 कोटींचा हिशेब कुठे? काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

मात्र, सियाने चेतन नावाच्या मुलाशी लग्न करायचं आहे, असं एकदा ही सांगितलं नसल्याचा गंभीर दावा तिच्या आई-वडिलांनी केल्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. तर यावेळी सियाच्या आई-वडिलांनी सांगितलं की, केतनचे स्थळ मित्तल यांनी आणलं. त्यावेळी आम्ही सियाला केतनचे फोटो दाखवले. आधी तिची संमती घेतली आणि मगचं अग्रवाल कुटुंबीयांशी पुढची चर्चा झाली.

शिवाय तिचा होकार आल्यानंतरच आम्ही लग्न करायचं ठरलवं तिची संमती होती, म्हणूनचं साखरपुडा घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सियाने आपणाला केतन पसंत नव्हता असा दावा खोटा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com