

Sangli News : सांगली जिल्हा परिषदेमध्ये नेमकी कोणाचा अध्यक्ष होणार याचे चित्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आहे. महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करू शकते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवलेल्या अटीमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची बैठक मिरजेतील शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेत सव्वा वर्ष अध्यक्षपद देईल. त्याच पक्षाला पाठींबा द्यायचा, असा निर्णय जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीच्या या अटीमुळे भाजपचे टेन्शन वाढणार आहे.
सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जयंत पाटील त्याचे नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादीच्या अटीमुळे जयंत पाटील यांना सत्तास्थापन करण्याची संधी असल्याचे देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
दरम्यान, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित घोरपडे यांनी सत्ता स्थापने बाबत कोणाला पाठींबा द्यायचा याचा निर्णय आम्हाला घ्यायचा अशून सर्व घडामोडींविषयी पक्षाध्यक्षांना भेटून माहिती देणार आहोत, असे एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले.
सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 18 आणि काँग्रेसकडे 11, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1 अशा एकूण 30 जागा आहेत. बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. महायुतीमध्ये भाजपकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेस 6 आणि शिवसेनेकडे 7 जागा आहेत. रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्यकडे प्रत्येक 1 अशा 31 जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अटीमुळे सत्ता समीकरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.