Sangli Politics : जयश्री पाटलांच्या दाव्यानंतर पृथ्वीराज पाटलांचे उमेदवारीवर भाष्य; ‘जयश्रीवाहिनी आदरस्थानी; पण...’

Assembly Election 2024 : जयश्रीताई पाटील यांनी सांगलीतून उमेदवारी मागितली आहे, त्यावर मी काही बोलणार नाही. कारण, मदनभाऊ आणि आम्ही एकत्र वाढलो आहोत. आम्हाला जयश्रीवाहिनी आदरस्थानी आहेत, असे पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले.
Prithviraj Patil-Jayshree Patil
Prithviraj Patil-Jayshree Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli, 02 September : सांगली मतदारसंघातून जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली आहे, उमेदवारी मागण्याचा त्यांना हक्क आहे. वहिनी आदरस्थानी आहेत, त्यामुळे सांगलीच्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घेतील, असे काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष तथा विधानसभेसाठी इच्छूक असलेले पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

सांगली विधानसभा मतदारसंघातून (Sangli Assembly Constituency) जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णयही जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) हेही सांगलीतून पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी मागील निवडणूक सांगलीतून लढवली होती, त्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात उमेदवारीचे माप टाकतात, हे आता पाहावे लागणार आहे.

उमेदवारीचा निर्णय लोकशाही पद्धतीने घेण्याचा काँग्रेस पक्षात प्रघात आहे. उमेदवारीसाठी सर्वांना एकाच मांडवाखालून जावे लागते. जयश्रीताई पाटील यांनी सांगलीतून उमेदवारी मागितली आहे, त्यावर मी काही बोलणार नाही. कारण, मदनभाऊ आणि आम्ही एकत्र वाढलो आहोत. आम्हाला जयश्रीवाहिनी आदरस्थानी आहे, असे पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले.

Prithviraj Patil-Jayshree Patil
Mahesh Kothe : महेश कोठेंनी अखेर ‘सोलापूर शहर उत्तर’मधून फुंकली विधानसभेसाठी तुतारी!

सांगलीच्या उमेदवारीचा निर्णय हायकमांड घेतील. पण, भाजप आमचा मुख्य विरोधक आहे. काँग्रेस पक्षात फूट पाडून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा अजेंडा आहे. सांगलीत लोकसभेला झालेल्या पराभवानंतर भाजपने तो डाव आखला आहे. पण आम्ही तो डाव यशस्वी होऊ देणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

सांगली विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी माझा निसटता पराभव झाला होता. मात्र, मला ८७ हजार मते मिळाली होती. त्या मतदारांसाठी मी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो होतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आठशे कोटींची कामे आणली आहे. काँग्रेस पक्षाचे काम आम्ही जनतेमध्ये नेले आहे, असा दावाही त्यांनी केला.

Prithviraj Patil-Jayshree Patil
Thackeray Vs Shinde : मुंबई वायव्य लोकसभेतील वादावर मोठी अपडेट; रवींद्र वायकरांना हायकोर्टाने दिले 'हे' निर्देश...

पृथ्वीराज पाटील हे संवाद सांगलीसाठी हा उपक्रम सुरू करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील यांनी विधानसभा उमेदवारीच्या अनुषंगाने भाष्य केले आहे. आता सांगलीतून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यात कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com