
Sangli News : कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील एमडी ड्रग्जचा कारखान्याच्या नव्या धक्कादायक माहितीमुळे आता खळबळ उडाली आहे. या कारखान्याचे कनेक्शन थेट कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीम उघड झाले आहेत. तर हा करखाना दाऊद इब्राहीमच्या हस्तकांकडून चालविला जात असल्याचे उघड झाले आहे. तर या प्रकरणात दुबईतून या टोळीचा म्होरक्या कुब्बावाला मुस्तफा यास अटक झाली आहे. त्याला भारतात आणले जात आहे. (Irli MD drugs factory in Kavthe Mahankal taluka has direct connections to notorious gangster Dawood Ibrahim)
गेल्या वर्षी मुंबईत एका झालेल्या कारवाईत 641 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले होते. त्याचा तपास करताना पोलीसांनी मुंबईतील मीरा रोड येथे छापा टाकला होता. ज्यात साजीद शेख ऊर्फ डॅब्ज याला अटक करत पोलिसांनी तीन किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. जे सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ तालुक्यातील इरळीमध्ये कारखान्यात तयार झाल्याचे समोर आले होते. यानंतर मुंबई क्राईम ब्रँचच्या 7 युनिटने इरळीत छापेमारी करत आठ जणांना अटक करत तब्बल 245 कोटी रुपयांचा 123 किलो एमडी ड्रग्जचा साठा हस्तगत केला होता.
त्यानंतर आतापर्यंत याची चौकशी सुरू होती. ज्यात आता आणखील धक्कादायक बाब समोर आली आहे. तर या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले असून हा कारखाना दुबईतून चालवला जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा कारखाना कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीमशी निगडीत ताहेर सलीम डोला आणि कुब्बावाला मुस्तफा चालवत असल्याचे निष्पण झाले.
ज्यानंतर या दोघांच्या नावे रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्या प्रत्यारोपणासाठी सीबीआय आणि मुंबई क्राईम ब्रँचने प्रयत्न केले होते. दुबई सरकारसोबत भारत सरकारने केलेल्या सततच्या संपर्कामुळे गेल्याच महिन्यात सलीम डोला याला भारतात आणलं आहे. पण कुब्बावाला मुस्तफा हा फरार होता. आता त्यालाही सीबीआय आणि मुंबई क्राईम ब्रँचने दुबईत ताब्यात घेतले आहे. आता त्याला भारतात आणण्याची कारवाई सुरू आहे. तर या धक्कादायक खुलाशानंतर सांगली थेट आंतरराष्ट्रीय पटलावर आली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील ड्रग्ज कारखान्याचे कनेक्शन थेट कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीमच्या हस्तकाशी उघड झाले आहेत. यामुळे सांगली आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. तर भारतात पुन्हा एकदा डी कंपनीचे पाळेमुळे शोधाण्याचे काम तपास यंत्रणांना करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.