
Kolahapur News : राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातून तीव्र होताना दिसत आहे. एकीकडे इंडिया आघाडीच्यावतीने या महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनात केली जात असतानाच भाजपचे सहयोगी सदस्य आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचे सातबारे घेत गडहिंग्लज तहसील कार्यालयावर पदयात्रा काढत हम महामार्ग चंदगडमधून न्यावा, अशी मागणी केली. मात्र, या मोर्चाचे बिंग भाजपचेच प्रदेश कार्यकारिणीचे विशेष सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी फोडले आहे.
आमदार शिवाजीराव पाटील यांनी सातबारा उतारे जमा करण्यासाठी अनेक शेतकरी मोर्चात सहभागी असल्याचे सांगितले होते. त्यासंदर्भात भाजपचेच (BJP) पदाधिकारी संग्राम कुपेकर यांनी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे किती शेतकऱ्यांनी सातबारा जमा केले. याचे माहिती मागितली. परंतु, 21जुलैपर्यंत शक्तिपीठ महामार्ग आपल्या जमिनीतून जाण्याकरिता शेतकऱ्यांनी एकही सातबारा उतारा सादर केला नसल्याचे लेखी उत्तर काळबांडे यांनी दिले आहे.
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी हा महामार्ग चंदगड मतदारसंघातून जाण्यासाठी विरोध दर्शविला. रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, विरोधकांना उत्तर देण्यासाठी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठ्या गर्दीने शक्तिपीठ महामार्ग समर्थनार्थ मोर्चा काढला.
त्यावेळी आमदार पाटील यांनी महामार्ग समर्थनार्थ सातबारा उतारे घेऊनच शेतकरी मोर्चात सहभागी झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर चंदगड मतदारसंघातून ‘शक्तिपीठ’ नेण्याची मागणी आमदार पाटील यांनी केल्यानंतर या भागात त्याचे पडसाद उमटू लागले.
त्याला अनुसरून संग्राम कुपेकरांनी, प्रांताधिकारी काळबांडे यांच्याकडे माहिती मागणारे लेखी पत्र दिले होते. शेतकऱ्यांची नावे, गट, सर्व्हे नंबर व गावांची यादी देण्याची मागणी केली होती. मोर्चा निघाल्यापासून (ता.14) सोमवारपर्यंत (ता. 21) दप्तर पडताळणी केली असता महामार्ग समर्थनार्थ निवेदन प्राप्त झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग जाण्यासाठी जमिनीचे सातबारे उतारे या कार्यालयात सादर केले नसल्याचे या लेखी पत्रात काळबांडे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.