भाजपच्या समरजित घाटगेंच्या विरोधात मुश्रीफ, संजयबाबा अन् मंडलिक एकत्र

हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे हे आता आमनेसामने आले आहेत.
Hasan Mushrif, Sanjay Ghatge and Sanjay Mandlik
Hasan Mushrif, Sanjay Ghatge and Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्यात वाद सुरू आहे. या प्रकरणी दोघांच्याही समर्थकांनी मोर्चा काढले होते. आता या वादात मुश्रीफ यांच्या पाठीशी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे हे उभे राहिले आहेत. हे तिघे एकत्र आल्याने समरजित घाटगेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कागल तालुक्यात एका कार्यक्रमात हे तिन्ही नेते एकत्र आले. कोण कधी जन्माला आला, यापेक्षा त्यांच्या कामाचे मूल्यमापन गरजेचे आहे, असा सल्लाही खासदार संजय मंडलिक यांनी समरजित घाटगेंचे नाव न घेता दिला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझ्यासह मुश्रीफ व संजयबाबा घाटगे एकत्र काम करीत आहोत. मधल्या काळात हे दोघे मला जरा विसरले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यासह सीबीआय, प्राप्तिकर या माध्यमातून या देशांत एकप्रकारची अघोषित आणीबाणी आहे. या पद्धतीने नेत्यांना नामोहरम करून सत्ता हस्तगत करण्याची कटकारस्थाने रचली जात आहेत.

आठवड्यापूर्वी रामनवमीला माझा वाढदिवस झाला होता. आता त्या वाढदिवसाचे संशोधन सुरू आहे. एखाद्या माणसाने कुठल्या दिवशी जन्मावं आणि तो दिवस नसावा, याविषयी संशोधन व्हावं हे दुर्दैवी आहे, असे मत मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. दरम्यान, संजयबाबांनी यावरून समरजित घाटगेंना टोला लगावला. ते म्हणाले की, मुश्रीफ रामनवमीला जन्मले आहेत. आता मी त्यादिवशी जन्मलो नाही त्याला काय करूया?

Hasan Mushrif, Sanjay Ghatge and Sanjay Mandlik
दुसऱ्या पत्नीच्या आत्महत्येस जबाबदार ती महिला कोण? सेना आमदाराकडं पोलिसांची विचारणा

समरजित घाटगे यांनी समर्थकांसह काही दिवसांपूर्वी कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. याला प्रत्युत्तर म्हणून मुश्रीफ समर्थकांनी नुकताच जोरदार मोर्चा काढला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी कागल शहरातील राम मंदिराला राजकीय अड्डा बनवले आहे. हसन मुश्रीफ यांची जन्मतारखेवरून त्यांनी बदनामी सुरु केली आहे, असा आरोप समर्थकांनी केला होता. घाटगे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत हसन मुश्रीफ समर्थकांनी कागल पोलीस ठाण्यावर हा मोर्चा काढला होता.

Hasan Mushrif, Sanjay Ghatge and Sanjay Mandlik
शिवसेना आमदाराच्या पत्नीच्या आमहत्येचं गूढ वाढलं; मुलाला केलेला मेसेज आला समोर

दरम्यान, समरजित घाटगे यांनी मुश्रीफांवर आरोप केले होते. ते म्हणाले होते, प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा झालेला प्रकार निंदनीय आहे. तसेच रामनवमीला जन्माला आल्याचा मुश्रीफांचा दावाही खोटा आहे. त्यांचा जन्म रामनवमीला नाही तर रंगपंचमी दिवशी झाला आहे. कारण विकिपीडिया वरती 24 मार्च 1954 ही तारीख आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला दिलेल्या कागदपत्रांमध्येही हीच जन्मतारीख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com