Sanjay Mandlik: मंडलिकांनी सांगितली स्वत:च्या पराभवाची कारणे, म्हणाले, "शाहू महाराजांबद्दल..."

Sanjay Mandlik Statement on Kolhapur Lok Sabha Constituency Defeat: "भुदरगड तालुक्यात काही महिन्यांपूर्वी उद्योगपती अदानींना जो प्रोजेक्ट दिला होता. त्याचाही राग लोकांच्या मनात आहे."
Chhatrapati Shahu Maharaj, Sanjay Mandlik
Chhatrapati Shahu Maharaj, Sanjay MandlikSarkarnama

Sanjay Mandlik on Kolhapur Lok Sabha Defeat: कोल्हापूर लोकसभेच्या निकालात शाहू महाराज छत्रपती यांनी खासदार संजय मंडलिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या पराभवावर खासदार संजय मंडलिक यांनी गुरुवारी (ता. 5 जून) प्रतिक्रिया दिली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर आज जिल्ह्यातील माहितीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पराभवानंतर खचून न जाता आणखी जोमाने काम करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचं मंडलिकांनी सांगितलं. यावेळी त्यांनी स्वतः आपल्या पराभवाची कारणे सांगितली.

कोल्हापूर (Kolhapur) लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी मला दलित समाजाची मते मिळाली नाहीत. मुस्लिम समाजाची मत मिळाली नाहीत. माझ्या मतदारसंघातून जाणारा शक्तीपीठ महामार्गाचा परिणाम झाला. भुदरगड तालुक्यात काही महिन्यांपूर्वी उद्योगपती अदानींना जो प्रोजेक्ट दिला होता. त्याचाही राग लोकांच्या मनात आहे. निवडणुकीपुर्ती त्या प्रोजेक्टला स्थगिती दिलेली आहे का? अशी शंकादेखील लोकांच्या मनात आहे. त्यामुळेच या लोकसभेत मला कमी मतदान मिळालं असल्याचं मंडलिकांनी सांगितलं.

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी अगदी मनापासून काम केलं. माझा पराभव जरी झाला असला तरीही पुढच्या काळात महायुती म्हणून आपण पुन्हा ताकतीने काम करण्याचा निर्धार करण्यासाठी आज बैठक झाली. ज्या विभागात मताधिक्य कमी झालं त्या विभागात कसं काम करता येईल याचं आत्मपरीक्षण करू, असंही ते म्हणाले.

शाहू महाराज यांच्या विजयावर बोलताना मंडलिक म्हणाले, "नूतन खासदार शाहू महाराजांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या कारकि‍र्दीत कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा. धैर्यशील माने देखील विजयी झालेले आहेत. यांचंही मी अभिनंदन करतो. शाहू महाराजांची उमेदवारी लवकर जाहीर झाली. माझी उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली. त्यामुळे मला अडचण निर्माण झाली.

Chhatrapati Shahu Maharaj, Sanjay Mandlik
Sushma Andhare On Devendra Fadnavis: फडणवीसांची राजीनाम्याची इच्छा अन् अंधारेंनी डिवचलं; म्हणाल्या, "इथून पुढे ते कधीच..."

शाहू महाराज यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर मी टीका केलेली नाही हे जनतेलादेखील माहिती आहे. त्यासंदर्भात मी बोललो होतो. पण त्यामुळे गादीचा अपमान होण्याचं काही कारण नाही. माझं मताधिक्य घटण्याचेदेखील ते कारण नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com