Mushrif on Sanjay Raut : संजय राऊतांनी एक महिन्याचा पगार दिला का? मुश्रीफांनी थेट सुनावले

Sanjay Raut one month salary News : मोर्चा पडळकर यांच्या विरोधात असताना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolahapur News : गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना अनेक वेळा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याशी संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. मोर्चा पडळकर यांच्या विरोधात असताना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली. त्यामुळे सहाजिकच भाजपला राग येणार, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगलीतील महाविकास आघाडीच्या मोर्चावर रोष व्यक्त केला.

गेल्या चार दिवसात अंबाबाईच्या दर्शनाला लाखो भक्त आले आहेत. मी आज दर्शन घेऊन अंबाबाईला प्रार्थना केली आहे, मराठवाड्यावर आलेले महापुराचे संकट दूर कर. पूरग्रस्त नागरिकांचे झालेले नुकसान भरून देण्याची ताकद अंबाबाईने सरकारला द्यावी, अशी प्रार्थना केली. तुळजाभवानीचा कोप शांत करावा, अशी प्रार्थना करवीर निवासिनी अंबाबाईला केली, असल्याचे मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले.

Hasan Mushrif
Bachchu Kadu On BJP: बच्चू कडूंनी भाजप मंत्र्यांना खडसावलं; म्हणाले, 'चांगले बोलता येत नसेल तर किमान...'

विरोधी पक्षाचे काही लोक गर्दीमध्ये घुसून काहीतरी वक्तव्य करत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न याच माध्यमातून केला जात आहे. पण अजितदादांच्या मनामध्ये काहीही नसते, यामधून वेगळा अर्थ काढू नका. संजय राऊत यांच्या बद्दल न बोललेलेच बरे, राऊत यांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आज आभार मानले असते. सुप्रियाताई, संजय राऊत, विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात आहेत. त्यांचे कामच आहे सरकारला पेचात पकडणे, पण शेतकऱ्यांना शांत करणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे काम आहे ते आम्ही करत असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Hasan Mushrif
Uddhav Thackeray On Modi: उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर धक्कादायक आरोप; म्हणाले,'बिहारमध्ये महिलांच्या खात्यावर 10 हजार रुपये..'

एखादा अधिकारी पार्टीमध्ये सहभागी होत असेल तर ते चुकीचे आहे, पण मला याबद्दल माहिती नाही. जिल्हाधिकारी जर चुकीचे वागत असतील तर याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नक्की दखल घेतील. कालच देशाचे गृहमंत्री अमित शहा आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

Hasan Mushrif
Uddhav Thackeray : धाराशिवमधील बांधावर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंचे मोठे आश्वासन; म्हणाले, 'हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत...'

राज्यातील महायुतीचे सरकार आणि केंद्र सरकार मिळून पूरग्रस्तांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कधी करायचे हे ठरले नव्हते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील, असेही मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif
Ajit Pawar : अजितदादांनी घेतली शरद पवारांच्या आमदाराची फिरकी; ‘लोक आमदार-बिमदार झाल्यावर वाढतात, आपण...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com