Udaysinh Patil Undalkar : विलासकाकांचा वारसा अन उंडाळकरांचा राजकीय उदय; ५३ वर्षांच्या योगदानाच्या उचीत सन्मानातून राजकीय पुनरागमनावरही शिक्कामोर्तब

Udaysinh Undalkar's Political Comeback : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड झाली आहे. यानंतर ५३ वर्षांच्या योगदानाला उचीत सन्मान मिळाल्याचे बोलले जात आहे.
Satara District Central Cooperative Bank Chairman Election; Udaysinh Patil Undalkar And Vilasrao Patil Undalkar
Satara District Central Cooperative Bank Chairman Election; Udaysinh Patil Undalkar And Vilasrao Patil UndalkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

कऱ्हाड : हेमंत पवार

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड हा सहकारातील सत्ताबदल नसून विलासकाकांनी ५३ वर्षांत निर्माण केलेला सहकारातील दबदबा कायम राखण्याची संधीच त्यांना यानिमीत्ताने मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटलांनी उंडाळकरांना दिलेल्या संधीने त्यांच्या राजकीय पुनरागमनावर शिक्कामोर्तब होवुन राजकीय वाटचालीलाही नवी उभारी मिळणार आहे. विलासकाकांच्या सहकारातील वारशाला उजाळा मिळुन त्यांच्या बॅंकेतील योगदानाची पोहचपावतीच अध्यक्षपदाच्या रुपाने ॲड. उंडाळकरांना मिळाली आहे.

माजी सहकारमंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर ऊर्फ विलासकाका यांनी १९६८ ते २०२१ अशी सलग ५३ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम केले. बँकेच्या कारभारात आर्थिक शिस्त आणण्याबरोबरच देशातील अग्रगण्य सहकारी बँकांच्या पंक्तीत बँकेला स्थान मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले.

जिल्हा बँकेच्या सत्ताकारणावर अनेक वर्षे त्यांची एकहाती पकड होती. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यासारख्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना अध्यक्षपदाची संधी देण्यातही विलासकाकांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या पश्चात आता त्यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा आल्याने हा विलासकाकांच्या योगदानाचा सन्मान मानला जात आहे.

Satara District Central Cooperative Bank Chairman Election; Udaysinh Patil Undalkar And Vilasrao Patil Undalkar
Satara District Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उदयसिंह पाटील उंडाळकर यांची निवड : ZP अध्यक्ष निवडीवेळची नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कऱ्हाड सोसायटीतील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. भाजपचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष धनंजय पाटील-आटकेकर यांच्याविरोधात ॲड. उंडाळकरांनी निवडणूक लढवली. या लढतीत कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसलेंची साथ यावेळी उंडाळकरांना मिळाली.

कृष्णा कारखान्याच्या राजकारणात यापूर्वी उंडाळकर गटाने भोसले गटाला केलेल्या सहकार्याची परतफेड या निवडणुकीत झाल्याने उंडाळकर जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळात पोहचले. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री पाटील, खासदार पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यांनी उंडाळकरांना अध्यक्षपदाची संधी देत जिल्हा बँकेच्या राजकारणात नव्या समीकरणांना बळ दिले. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि अॅड. उंडाळकर हे सख्खे साडू असल्याने त्याचाही फायदा त्यांना झाला. विविध राजकीय गटांच्या पाठबळातून उंडाळकरांनी अध्यक्षपदापर्यंत मजल मारली.

या निवडीमुळे विलासकाकांच्या निधनानंतर उंडाळकर गटाला पुन्हा जिल्हास्तरावर कामासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले आहे. जिल्हा बँक अध्यक्षपदामुळे सहकार क्षेत्रातील निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील राजकीय विरोधकांपुढेही उंडाळकरांचे वाढते वजन नवे आव्हान ठरू शकते. बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकार क्षेत्राशी संपर्क आणि नेतृत्वाची संधीमुळे आगामी निवडणुकांत उंडाळकर गटाची ताकद वाढु शकते. विलासकाकांनी ५३ वर्षांत निर्माण केलेला सहकारातील दबदबा कायम राखण्याची संधीच अॅड. उंडाळकरांना अध्यक्ष्षपदाच्या रुपाने मिळाली आहे.

Satara District Central Cooperative Bank Chairman Election; Udaysinh Patil Undalkar And Vilasrao Patil Undalkar
Satara District Bank Election: अतुल भोसलेंनी फेडला उंडाळकरांचा पैरा : कृष्णा कारखान्यातील मदतीची जिल्हा बँकेतील विजयाने परतफेड

पाटलांची उंडाळकरांच्या ऋणातुन उतराई

माजी मंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी राजकीय पक्ष बाजुला ठेवुन माजी खासदार (कै) लक्ष्मणराव पाटील यांना खासदारकीसह जिल्हा बॅंकेत ताकद दिली. त्याचबरोबर त्यांच्या राजकीय प्रवासात विलासकाकांची साथही मोलाची ठरली होती. त्यांच्यानंतर खासदार पाटील आणि विलासकाकांची पुढची पिढी म्हणन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, ॲड. उंडाळकर हे राजकारणात सक्रीय आहेत. विलासकाकांनी (कै) पाटील यांनी जशी साथ केली त्याच पध्दतीने सध्या मंत्री पाटील, खासदार पाटील यांनी ॲड. उंडाळकर यांना साथ करुन जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपदी संधी देवुन त्यांच्या ऋणातुन उतराई होण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

 Satara District Bank elections; Udaysinh Patil Undalkar
Udaysinh Patil Undalkar-Atul Bhosale
Udaysinh Patil Undalkar-Shambhuraj Desai
Adv. Udaysinh Patil Undalkar-Anandrao Patil