Satara District Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उदयसिंह पाटील उंडाळकर यांची निवड : ZP अध्यक्ष निवडीवेळची नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न

Udaysinh Patil Undalkar elected Satara District Bank president : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे.
 Satara District Bank elections; Udaysinh Patil Undalkar
Satara District Bank elections; Udaysinh Patil UndalkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या दीपक चव्हाण यांची निवड झाली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत बँकेवर सत्ता स्थापन केली असल्याची चर्चा होती. यातून जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींचा वचपा जिल्हा बँकेच्या निवडीत काढल्याचे बोलले गेले. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवले नसून बँकेत महायुतीचीच सत्ता आल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

जयकुमार गोरेंनी दिल्या उदयसिंह उंडाळकरांना शुभेच्छा

या निवडीनंतर भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीचा अध्यक्ष झाला आहे. त्यामुळे यावर अधिक काही बोलता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उदयसिंह उंडाळकर यांना अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात बँकेचे कामकाज चांगल्या पद्धतीने चालावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचाच उमेदवार विराजमान होईल, असे गोरे वारंवार सांगत होते. मात्र प्रत्यक्षात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे गेले. यामुळे ते नाराज आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना गोरे म्हणाले की, नाराजीचा कोणताही विषय नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांचा अध्यक्ष झाला आहे. बँकेचे कामकाज उत्तम चालावे, एवढीच अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 Satara District Bank elections; Udaysinh Patil Undalkar
Satara District Bank Election: अतुल भोसलेंनी फेडला उंडाळकरांचा पैरा : कृष्णा कारखान्यातील मदतीची जिल्हा बँकेतील विजयाने परतफेड

‘जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेची निवडणूक वेगळी’

जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय संघर्षाचा वचपा जिल्हा बँकेच्या निवडीत काढल्याची चर्चा पत्रकारांनी उपस्थित केली. त्यावर गोरे यांनी ही चर्चा फेटाळत दोन्ही निवडणुकांमधील फरक स्पष्ट केला. ‘कोणी कशाचा वचपा काढला, हा आजचा विषय नाही. जिल्हा परिषदेत आम्ही वेगळे लढलो होतो; मात्र जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढलो. त्यामुळे जिल्हा बँकेत आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. बाकीच्या गोष्टी ऑफ द रेकॉर्ड आहेत. त्यावर बोलणे योग्य नाही,’ असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी, ‘कोणतीही निवडणूक अंतिम नसते. आगे आगे देखो होता है क्या,’ असे म्हणत आगामी राजकीय घडामोडींबाबत सूचक विधान केले. पत्रकारांनी त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ विचारला असता, कोणतीही निवडणूक अंतिम नसते, पुढे काय होते ते पाहा, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

‘बँकेच्या फॉर्म्युलाच्या चर्चेत मी नव्हतो’

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी नेमका कोणता फॉर्म्युला ठरला होता, याबाबतही जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिले. या चर्चेत आपण सहभागी नव्हतो, असे सांगत त्यांनी या निर्णयाची माहिती शिवेंद्रराजे भोसले यांनाच असल्याचे म्हटले. ‘बँकेच्या निवडणुकीच्या फॉर्म्युलाच्या चर्चेत मी कधीच नव्हतो. महायुतीच्या चर्चेतही नव्हतो. त्यांच्यात नेमके काय ठरले, हे शिवेंद्रराजेंनाच माहिती आहे,’ असे गोरे म्हणाले. तसेच, सोसायटीच्या निवडणुका आम्ही वेगळ्या लढलो होतो. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून बँकेचा अध्यक्ष भाजपचा होईल, असे आपण म्हटले होते. बँकेत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने अध्यक्षपदाबाबत अपेक्षा व्यक्त करण्यात गैर काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘अध्यक्षपदाचा निर्णय कुठे झाला, हे मला माहिती नाही’

स्वकीयांनीच अध्यक्षपदाच्या निवडीत खोडा घातल्याच्या आरोपावरही गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्यात सर्व काही चांगले आहे, असे सांगत त्यांनी असा कोणताही प्रकार नसल्याचा दावा केला. ‘अध्यक्षपदाचा निर्णय नेमका कुठे झाला, हे मला माहिती नाही. या संदर्भातील सर्व अधिकार शिवेंद्रराजेंना दिले होते. माझ्यापेक्षा ते याबाबत अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात. मी महायुतीच्या चर्चेत नव्हतो,’ असे स्पष्टीकरण जयकुमार गोरे यांनी दिले.

 Satara District Bank elections; Udaysinh Patil Undalkar
Satara District Bank Election: मंत्री जयकुमार गोरेंना मोठा धक्का; सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधीच बड्या नेत्याने हाती घेतला 'धनुष्यबाण'; भाजप 'चाल' बदलणार..?

दरम्यान, सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण विराजमान झाले आहेत. या निवडीनंतर महायुतीतील सत्तासमीकरण, भाजपची भूमिका आणि आगामी राजकीय घडामोडी याबाबतच्या चर्चांना आता वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.