Shambhuraj Desai news : खोलवर जखमा जालीम औषधानेच..! जिव्हारी लागलेल्या घावाची शंभूराज देसाईंकडून परतफेड, गोरे बॅकफूटवर

Satara District Bank Election, Jaykumar Gore, Satara Politics : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्येच मोठा वाद पाहायला मिळाला होता. निवडीवेळी झालेल्या झटापटीत देसाईंच्या हाताला जखम झाली होती.
Jaykumar Gore-shivendra raje bhosale-shambhuraj desai
Jaykumar Gore-shivendra raje bhosale-shambhuraj desaiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahayuti Political Conflict : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंह पाटील उंडाळकर आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण विराजमान झाले आहेत. ही निवड करताना भाजपला डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामागे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या गोंधळाची पार्श्वभूमी असल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या एका विधानाने त्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.

सातारा जिल्हा बँकेची अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली असली, तरी या निवडीने महायुतीमधील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आणला आहे. भाजपचाच अध्यक्ष होणार, असा दावा करणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी या निवडीनंतर अध्यक्ष महायुतीचाच झाला, अशी सावध भूमिका घेत आपल्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे.

बँकेच्या निवडणुकीच्या फॉर्म्युलाच्या चर्चेत मी कधीच नव्हतो. महायुतीच्या चर्चेतही नव्हतो. त्यांच्यात नेमके काय ठरले, हे शिवेंद्रराजेंनाच माहिती आहे, असेही गोरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे शंभूराज देसाई यांनी मात्र गोरेंच्या विधानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार पलटवार केला.

Jaykumar Gore-shivendra raje bhosale-shambhuraj desai
Gokul Dairy News : 'गोकुळ'मध्ये मोठा धमाका; प्रशासकांनीच फोडलं तत्कालीन संचालक मंडळाचं बिंग, निर्णयांवर थेट प्रहार

'कुठलीही निवडणूक अंतिम नसते' या विधानाचा अर्थच जयकुमार गोरेंना समजला नसल्याचा टोला देसाईंनी लगावला. एवढंच नाही, तर काही जखमा वरवर बऱ्या झाल्यासारख्या दिसतात. पण लवकर बऱ्या होत नाहीत. कदाचित त्या खोलवर असतात. त्या लवकर बऱ्या होत नाहीत. जालीम औषध घेतल्यावरच बऱ्या होतात, असे सांगत देसाईंनी सूचक इशाराही दिला आहे.

Jaykumar Gore-shivendra raje bhosale-shambhuraj desai
Harshvardhan Patil Chairman : कर्मयोगी कारखान्याच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील; पद मिळताच केली मोठी घोषणा

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्येच मोठा वाद पाहायला मिळाला होता. निवडीवेळी झालेल्या झटापटीत देसाईंच्या हाताला जखम झाली होती. त्यांनी विधानसभेतही त्याचा उल्लेख केला होता. हा घाव देसाई यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे आजच्या त्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक निवडणुकांमध्ये हा संघर्ष सातत्याने पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.