Gokul Dairy News : 'गोकुळ'मध्ये मोठा धमाका; प्रशासकांनीच फोडलं तत्कालीन संचालक मंडळाचं बिंग, निर्णयांवर थेट प्रहार

Gokul Dairy, Gokul Milk Union, Maharashtra News, Pradeep Malgave, Gokul Administrator : गेल्या वर्षाच्या तुलनेत संघाला सप्टेंबर २०२६ अखेर १२८ कोटींचा व्यापारी नफा कमी झाला आहे, अशी माहिती प्रशासकांनी दिली आहे.
Gokul Board Meeting
Gokul Board MeetingSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : गोकुळच्या नवीन संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत प्रशासक काळात झालेल्या कामकाजासंदर्भात आढावा घेण्याचा निर्णय झाला. शिवाय निवडणुकीच्या निमित्ताने अनेक लोकप्रतिनिधी आणि आजी-माजी संचालकानी प्रशासक काळात गोकुळ दूध संघाला तोटा सहन करावा लागला, असे आरोप केले.

मात्र प्रशासक प्रदीप मालगावे यांनी प्रशासक काळातील वस्तुस्थिती आणि तत्कालीन संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रशासक काळात कोणता तोटा झाला, याचं बिंग फोडले आहे.

तत्कालीन संचालक मंडळाने दूध खरेदी दरात वाढ केली; पण विक्री दरात वाढ केली नसल्याने गोकुळवर २८० कोटी रुपयांचा भार पडला. तर पशुखाद्य विभागाला २४ कोटींचा नव्हे, तर १६ कोटींचा तोटा झाल्याची माहिती प्रशासकीय मंडळाचे मालगावे यांनी दिली. प्रशासक काळात ‘गोकुळ’ला तोटा झाला म्हणणाऱ्यांना आरसा दाखविण्यासाठी प्रशासकांनी एक प्रकारची श्वेतपत्रिकाच आज प्रसिद्ध केली.

प्रशासकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गोकुळवर प्रशासक येण्यापूर्वी संचालक मंडळाने फेब्रुवारी २०२६ मध्ये गाय दूध खरेदी दरात वाढ केली. मात्र, विक्री दरात वाढ केली नसल्याने २०२५-२६ च्या आर्थिक वर्षात संघावर २८० कोटी रुपयांचा भार पडला. यामध्ये सप्टेंबर २०२६ अखेर ती रक्कम सुमारे १२० कोटींच्या आसपास गेली.

Gokul Board Meeting
Woman Sarpanch news : महिला सरपंचाची थेट CM फडणवीसांकडे तक्रार; जागेवरून आदेश अन् खंडणीखोर टोळीच्या आवळल्या मुसक्या

गेल्या वर्षाच्या तुलनेत संघाला सप्टेंबर २०२६ अखेर १२८ कोटींचा व्यापारी नफा कमी झाला आहे. यावर उपाय म्हणून मे २०२६ मध्ये गाय आणि म्हैस दूध विक्री दरात वाढ करून यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. पशुखाद्य निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत ३५ ते ४० टक्के वाढ झाली.

निवडणुकीदरम्यान पशुखाद्य विभागाला २४ कोटींचा तोटा झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, २४ कोटींचा नव्हे, तर सोळा कोटींचा तोटा झाला आहे. पशुखाद्य दरवाढ न करण्यामागे उच्च न्यायालयाने संघाची निवडणूक प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण करण्याचे दिलेले आदेश, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खर्चात आणखी वाढ होऊ नये, हा दृष्टिकोन होता. मार्च २०२६ अखेर तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात आयकर भरण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली नव्हती. त्यामुळे ऑगस्ट २०२६ मध्ये प्राधिकृत मंडळाला १८ कोटी रुपयांचा आयकर भरावा लागला. याचाही ताळेबंदातील तोटा दिसण्यावर परिणाम झाला.

Gokul Board Meeting
Congress Politics : वडेट्टीवार-धानोरकरांचा सत्तेचा फॉर्म्युला फुटला! दोन्ही नेत्यांसह सहा जणांच्या सह्या, अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर...

प्रशासकीय मंडळाने केलेली बचत व निर्णय

सहा महिन्यांत व्यवस्थापन खर्चात ४ कोटींची बचत.

बगॅस खरेदीमुळे उत्पादन खर्चात सुमारे १० लाखांची बचत.

कच्च्या मालाच्या दरात वाढ, तरीही पशुखाद्य दर स्थिर.

म्हैस दुधाला प्रतिलिटर १.५० रुपये, तर गाय दुधाला एक रुपया दरवाढ.

२४३ गावांत दूधवाढ कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी.

दोन नवीन बल्क मिल्क कुलर कार्यान्वित.

खासगी दूध विक्रीवर नियंत्रण.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध संकलन वाढीसाठी प्रशासकीय समन्वय.

सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाशी सामंजस्य करार.

खरेदी प्रक्रियेत सुमारे १० लाखांची बचत.

कोल्हापूर व पुणे विभागांत ५५ नवीन वितरक.

दूध विक्रीत दररोज १.३३ लाख लिटरपर्यंत वाढ.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.