Satara News: देशभरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या सणाची चाहूल लागताच सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष हे बोनसकडे लागलेले असतात. यात सरकारी आणि खासगी अशा दोन्हीही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र,एका ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमाची सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याची वाडी गावच्या ग्रामपंचायतीनं दिवाळीनिमित्त एक अनोखा उपक्रम राबवत वेगळं पाऊल उचललं आहे. या ग्रामपंचायतीनं चक्कं संपूर्ण गावालाच बोनसची वाटप केली आहे. कर्मचाऱ्यांना नाही, तर गावातील नागरिकांनाच दिवाळीचा बोनस वाटला आहे.
मान्याची वाडी या सातारा जिल्ह्यातील छोट्याशा गावानं एकप्रकारे लोकांचा सहभाग आणि एकोप्यातून काय होऊ शकतं हे दाखवून दिलं आहे. जे भल्याभल्या लोकप्रतिनिधींना असा निर्णय घेणं शक्य होत नाही.
अवघी 98 कुटुंब आणि 420 माणसांच्या गावानं थेट दिवाळीच्या बोनस वाटपावरुन सर्वत्र चर्चेचा विषय ठरताना दिसून येत आहे. सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी दाखवलेली दूरदृष्टी अन् सगळ्यांच्या सहभागामुळे हे छोट्याशा गावानं ग्रामपंचायतनं एक आद
मान्याची वाडीनं आरोग्य,महिला सक्षमीकरण, शिक्षण, स्वच्छता, वृक्षारोपण अशा सर्वच पातळ्यांवर विकासाच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला आहे. गावानं 2024 मध्ये स्वतःचा एक अभिनव उपक्रम राबवला त्याद्वारे ठराविक रक्कम उभी केली होती. आता त्या रक्कमेतून दरवर्षी जादाची रक्कम प्राप्त होते. त्याच रकमेतून घरपट्टी पाणीपट्टी इतर कर आणि उर्वरित रक्कम संबंधित खातेदारांना रोख स्वरूपात दिवाळी बोनस वाटप केली जाते.
ग्रामस्थांकडून गेल्या 24 वर्षांपासून प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असतात. या गावानं 2024 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोत्तम पंचायतचा पुरस्कार प्रदा न करण्यात आला आहे. या राष्ट्रीय पुरस्कारासोबत गावाला तब्बल 1, 50,00,000 म्हणजेच दीड कोटीचे पारितोषिक मिळाले.
तसेच राज्य सरकारचा 1 कोटीचा ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कारानेही या गावच्या ग्रामपंचायतला गौरविण्यात आलं आहे. मान्याची वाडी ग्रामपंचायतकडून गावात अपारंपारिक आणि हरित ऊर्जेविषयी जागरुकता निर्माण करत त्याची प्रभावी अंमलबजावणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.