Karad Political News : मुंढेतील महापारेषण प्रकल्पग्रस्तांना फडणवीसांनी प्रश्न मार्गी लावण्याची दिली ग्वाही

Mahapareshan project victims in Mundhe : प्रकल्पग्रस्तांनी फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली.
Devendra Fadnavis, Atul Bhosale
Devendra Fadnavis, Atul BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Karad Political News : कराड दक्षिण मतदारसंघातील मुंढे येथील महापारेषण प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांच्या पुढाकारातून नागपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.

मुंढे येथील महापारेषण (Mahapareshan) च्या प्रकल्पात बाधित झालेल्या 35 जणांना 2016 साली नोकरीत घेण्यात आले. पण प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरीस लागलेल्या या प्रकल्पग्रस्तांना गेली 7 वर्षे नोकरीत कायम करण्यात आलेले नाही. याप्रश्नी अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी पुढाकार घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी या प्रकल्पग्रस्तांनी काही दिवसांपूर्वी कराड येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीवेळी केली होती.

Devendra Fadnavis, Atul Bhosale
Loksabha Election : चाललंय तरी काय...! काँग्रेसचा 'हा' बडा नेताच म्हणाला, २०२४ ला भाजपचीच हवा'!

त्यावेळी या प्रश्नाबाबत लवकरच उपमुख्यमंत्र्यांबरोबर प्रकल्पग्रस्तांची (Project victims) भेट घडवून आणण्याचे अभिवचन भोसले यांनी दिले होते. त्यानुसार नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशना (Nagapur Winter Session) च्या पार्श्वभूमीवर भोसले यांच्या पुढाकारातून प्रकल्पग्रस्तांनी फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. या प्रकल्पात बाधित झालेल्या कुटुंबातील जे युवक नोकरीत आहेत, त्यांना कायम करावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन फडणवीस यांना देण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली. तसेच याप्रश्नी 20 डिसेंबरनंतर मुंबईत प्रकल्पग्रस्तांची संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावेळी मुंढे गावचे उपसरपंच सागर पाटील, राहुल साळवी, राहुल जमाले, दत्ता माळी, अविनाश साळवी, प्रशांत सावंत उपस्थित होते.

कराड दक्षिण मतदारसंघातील बाधितांचा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल, अशी आशा प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी कराड दक्षिणमधील अन्यही प्रश्न तसेच विकासकामांचे प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांना दिले आहेत. यावर लवकरच निर्णय होवून प्रलंबित विकासकामांना गती येईल, असे त्यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Devendra Fadnavis, Atul Bhosale
Assembly Winter Session : ''...म्हणून अजित पवार इकडे आले'' ; विधिमंडळात एकनाथ शिंदेंचं विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com