Shashikant shinde on Shivendraraje Bhosale : 'दुसऱ्याचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो', शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रसिंहराजेंना प्रत्युत्तर

Loksabha Election 2024 : शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादीचा सातारा हा बालेकिल्ला राहिला नाही, असे म्हणत सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकत वाढलेली आहे. त्यामुळे वाढलेली ताकत लक्षात घेता महायुतीत सातारा लोकसभेची जागा ही भाजपकडे राहावी, अशी मागणी केली होती.
Shashikant shinde  Shivendraraje Bhosale
Shashikant shinde Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Satara Loksabha News : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र, उदयनराजे संभाव्य उमेदवार असतील. त्यांची प्रचाराला देखील सुरवात केली आहे. महायुतीकडून आयोजित कार्यक्रमात आमदार शिवेंद्रसिंहराजे यानी महाविकास आघाडीवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) सातारा आता बालेकिल्ला राहिलेला नाही, असा जोरदार हल्ला शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. या हल्ल्याला शरद पवार गटाचे लोकसभा उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Shashikant shinde  Shivendraraje Bhosale
Satara Lok sabha News : 'सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही...' ; शिवेंद्रसिंहराजेंनी शिंदेंना डिवचलं!

'बालेकिल्ला कोणाचा आहे, कोणाचा नाही याला मी महत्त्व देत नाही. लोकांच्या मनात यावेळेस भाजप सरकारच्या विरोधात भावना असून ती या निवडणुकीत दिसून येईल. बालेकिल्ला होण्यासाठी भाजपला दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची गरज का लागते. दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो. लोकांच्या हृदयातून पक्ष वाढत असतो. त्यानुसार आजही सातारा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे.' असे प्रतिउत्तर आमदार शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले.

'सातारा जिल्हा शरद पवार (Sharad Pawar) साहेब, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. त्यांच्या विचारांची परंपरा जतन करणे हे माझे कर्तव्य आहे. देशात व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या हुकुमशाहीच्या विरोधात लढताना मतदार राजा माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिल. जिल्ह्याचा विकासासाठी प्रयत्न करणे व सामान्य लोकांना चांगल्या प्रकारचा प्रतिनिधीत्व देणार हे माझे कर्तव्य आहे.कोणाचे आव्हान म्हणून पाहणार नाही. लोकांत भाजपविषयी नाराजी असून त्यातूनच सातारा लोकसभा मतदारसंघात उठाव होईल. यातूनच शंभर टक्के जनता इतिहास घडवेल.', असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादीचा सातारा हा बालेकिल्ला राहिला नाही, असे म्हणत सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकत वाढलेली आहे. त्यामुळे वाढलेली ताकत लक्षात घेता महायुतीत सातारा लोकसभेची जागा ही भाजपकडे राहावी, अशी मागणी केली होती. मात्र अजुनही महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट) की भाजप लढवणार हे लवकरच स्पष्ट होईल.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com