Lok Sabha Election 2024 : खंडाळा तालुक्यातल्या अतीट गावातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेले पुरुषोत्तम जाधव यांनी सुरुवातीला पोलिस खात्यात नोकरी केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या प्रशंसेने प्रभावित होऊन त्यांनी समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा निर्णय घेतला. त्याच भावनेतून नोकरी सोडून त्यांनी सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. त्यासाठीत्यांनी पुरुषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले.
लोकाग्रहास्तव त्यांनी 2009 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून सातारा लोकसभेची निवडणूक उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लढली. त्यात त्यांना 2 लाख 35 हजार मते मिळाली, पण ते पराभूत झाले. या अपयशाने खचून न जाता त्यांनी त्यानंतर वाई विधानसभा व सातारा लोकसभेची दुसऱ्यांदा अपक्ष निवडणूक लढली. पण त्यातही त्यांना यश मिळाले नाही. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'गुडबुक'मध्ये असून त्यांच्याकडे शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आहे. सातारा लोकसभा मतदारंसघातून 2024 ची निवडणूक लढवण्याची तयारी ते पुन्हा करत आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा-जावळी, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 1951 ते 1998 पर्यंत 1996 चा अपवाद वगळता या मतदारसंघावर काँग्रेसची मक्तेदारी होती. या कालखंडात यशवंतराव चव्हाण, किसन वीर, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले हे दिग्गज नेते या मतदारसंघातून खासदार झाले.
1996 मध्ये शिवसेनेचे हिंदूराव नाईक-निंबाळकर खासदार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1999 पासून आतापर्यंत या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. आता 2024 च्या लोकसभेसाठी शिंदे गट शिवसेनेतून पुरुषोत्तम जाधव इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीतून आतापर्यंत या मतदारसंघासाठी खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील व पुरुषोत्तम जाधव हे तिघे इच्छुक असून, त्यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुरुषोत्तम बाजीराव जाधव
31 डिसेंबर 1963
दहावी
कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)
खंडाळा तालुक्यातील अतीट गावातसर्वसामान्य शेतकरी पुरुषोत्तम जाधव यांचा जन्म झाला. आई-वडिलांनी पुण्यात भेळची हातगाडी लावून मुलांचे पालनपोषण केले. आई गृहिणी असून वडील बाजीराव जाधव हे वारकरी होते. यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. पत्नी गृहिणी आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मुलाचा स्वतंत्र व्यवसाय आहे.
शेती, उद्योग, बांधकाम व्यावसायिक
सातारा
शिवसेना (आता शिंदे गट शिवसेना)
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी व वारसा नसताना पुरुषोत्तम जाधव यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीमधून सातारा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांच्योसमोर उदयनराजे भोसले हे उमेदवार होते. या निवडणुकीत जाधव यांना तब्बल दोन लाख 35 हजार मते मिळाली, मात्र ते पराभूत झाले. त्यानंतर सहा महिन्यांनी ते वाई विधानसभेची निवडणूक लढले, त्यामध्येही त्यांना यश मिळाले नाही. तरीही जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेची चांगली बांधणी केली. त्यानंतर 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढली. त्यांना जिल्हाप्रमुखपद सोडावे लागले. त्यावेळी त्यांना उदयनराजेंविरोधात एक लाख 55 हजार मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व 2014 ची वाई विधानसभेची निवडणूक लढली. त्यातही त्यांना यश मिळाले नाही.
त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा लोकसभेची तयारी केली. त्यावेळी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेत घेतले. पण, त्यांना डावलून सातारा लोकसभेसाठी नरेंद्र पाटलांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे ते नाराज झाले पण, त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले. 2019 च्या पोटनिवडणुकीत तसेच त्यासोबत झालेल्या वाई मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरले. पण तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. आता ते 2024 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून इच्छुक आहेत.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने "झी महाराष्ट्र कुस्ती दंगल" नावाची अनोखी स्पर्धा होणार होती, पण त्यात सातारा जिल्हाचे नामोनिशाण नव्हते. याची खंत उराशी असल्याने त्यांनी स्वतःच्या खिशातील अडीच कोटी रुपये भरून या स्पर्धेत सातारला प्रतिनिधित्व मिळवून दिले. या कुस्ती संघाला यशवंतराव चव्हाण साहेबांचे यशवंत हे नाव दिले त्या स्पर्धेत यशवंत सातारा संघाने उपविजेतेपद पटकावले होते. सातारा जिल्ह्यात पुरुषोत्तम जाधव जनकल्याण प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अपंगांना मोफत अवयवदान, तरुण-तरुणींना पोलिस व सैन्य भरतीपूर्व मोफत निवासी प्रशिक्षण देणे, खेळाडूंना प्राधान्य देणे आदी कामे करतात. कोरोना काळात सहा महिने पायाला भिंगरी लावून स्वखर्चाने पीपीइ किट व औषधांचे वाटप केले.
निवडणूक लढवली नव्हती.
दांडगा जनसंपर्क आहे. युवकांमध्ये आणि सर्वसामान्यांत लोकप्रिय आहेत.
सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मचा वापर करतात.
वाद होतील असे वक्तव्य केलेले नाही.
सर्वसामान्य जनता
मतदारसंघांत संपर्क, सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध, युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय, विविध सामजिक उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण झालेली प्रतिमा.
सातारा लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांत स्वत:चे कार्यकर्ते, नेटवर्क नाही. कराड, सातारा, जावळी मतदारसंघात फारसा संपर्क नाही. विकासकामे सर्व मतदारसंघांत केलेली नाहीत.
सातारा लोकसभा मतदारसंघात 2014 मध्ये अपक्ष म्हणून लढले होते. त्यावेळी तब्बल पावणे दोन लाख मते मिळाली होती. त्यामुळे यावेळेस उमेदवारी मिळाली नाही आणि ते अपक्ष लढले तर महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.