Thackeray Group News: ठाकरे गटाला धक्का; माजी जिल्हाप्रमुख, नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Nagpur Winter Session 2023: पालघरमधील अजून आठ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
Thackeray Group News
Thackeray Group NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News: एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर सेनेतील गळती थांबण्याचे नाव घेत नाही. लातूर आणि पालघरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लातूरमधील माजी जिल्हाप्रमुख आणि पालघरमधील चार नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पालघरमधील चार नगरसेवकांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात नगरसेवक उत्तम घरत, सुभाष पाटील यांच्यासह इतर नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरमधील अजून आठ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

Thackeray Group News
Bhausaheb Kamble: शिर्डी लोकसभेसाठी भाऊसाहेब कांबळेंना ठोकला शड्डू!

लातूरमध्येही ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

अनेक वर्षापासून शिवाजी माने हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजी माने यांची जिल्हाप्रमुख पदावरून काढून जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली होती. यामुळे शिवाजी माने हे ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती

Thackeray Group News
Jashraj Patil News: अपघातग्रस्त रिक्षा काढण्यासाठी आमदारपुत्र उतरले खड्ड्यात!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com