Satara SP Tushar Doshi : सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेली कथित मतचोरी, पोलिसांच्या मदतीने राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषद इमारतीतूनच अटक करून मतदानापासून वंचित ठेवल्याचा प्रकार आणि मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की राज्यभरात चर्चेत आहे.
पण ज्यांच्या नेतृत्वात सातारा पोलिसांनी ही कारवाई केली ते जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी वैद्यकीय रजेवर गेले असल्याची माहिती आहे. मागील 4 दिवसांपासून ते रजेवर आहेत. आता ते खरंच आजारी पडल्याने वैद्यकीय रजेवर गेले आहेत की राज्य सरकारकडून त्यांना निलंबनाऐवजी सक्तीच्या विश्रांतीसाठी पाठवले आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
जिल्हा परिषदेतील राडा राज्यभरात चांगलाच गाजला. या राड्यानंतर सातारा पोलीस प्रशासनावर बरीच टीका झाली, छी-थू झाली. सोमवारी विधानपरिषद आणि विधानसभेतही हा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते.
निलंबन आदेश रद्द होणार?
दरम्यान, गोऱ्हे यांचे आदेश रद्द होण्याची दाट शक्यता आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर भाषेत याबाबतचे संकेत दिले आहेत. यापूर्वी आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांचे निलंबन आदेश विधानसभेला मागे घ्यावे लागले होते. त्यामुळे असे निलंबन करण्याचे आदेश देण्याचा अधिकार या सभागृहाला आहे का? यावर चर्चा सुरु झाली होती.
दोशी यांच्या निलंबन आदेशावर भाजपकडून हरकत घेण्यात आली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वकिली भाषेत हे अधिकार केवळ कार्यकारी मंडळ अर्थात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे आहेत, असे स्पष्ट केले. त्यामुळे दोशी यांचे निलंबन आदेश रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.