Satara ZP News: कराडच्या ZP सदस्यांना सभापतीपदी संधी मिळण्याची दाट शक्यता; भाजपसह राष्ट्रवादी-शिवसेनेनंही लावली 'फिल्डिंग'

Satara Politics: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडी नाट्यमय घडामोडीनंतर नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर आता उद्या (शनिवारी) जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापती निवडी होणार आहेत. त्यावरही भाजपने दावा केला आहे.
Satara ZP Sabhapati Election
Satara ZP Sabhapati ElectionSarkarnama
Published on
Updated on

Karad News: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडी नाट्यमय घडामोडीनंतर नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर आता उद्या (शनिवारी) जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापती निवडी होणार आहेत. त्यावरही भाजपने दावा केला आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांत झेडपीचे अध्यक्ष - उपाध्यक्षपद मिळालेले नाही, त्या तालुक्यांतील सातारा जिल्हा परिषद सदस्यांना सभापतीपदी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी रणनिती आखली असून राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेच्या नेत्यांनीही आमचेच सभापती झाले पाहिजे यासाठी फिल्डिंग लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेकडे बहुमत असुनही सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष करता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना अपहरणाच्या प्रकरणात अटक झाली. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांची तीसच बेरीज झाली तर त्यात बाजी मारुन भाजपने 33 सदस्यांचा पाठिंबा मिळवत अध्यक्ष, उपाध्यक्षपद खेचून आणले. त्यामुळे बहुमत नसतानाही भाजपच वरचढ झाल्याचे दिसून आले.

जिल्हा परिषदेच्या सभापतीनिवडी उद्या होणार आहेत. त्यातच कालच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. त्याचबरोबर अध्यक्षांच्या उपस्थितीत काही निवडक सदस्यांचीही बैठक झाली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी सभापती निवडीसाठी चांगलीच तयारी केलेली दिसून येत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेनेही सभापती आपल्याच पक्षांचे व्हावे यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे उद्या पुन्हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनेच्या नेत्यांत कलगीतुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या तालुक्यांना संधी मिळू शकते

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांचा कोरेगाव आणि उपाध्यक्ष यांचा सातारा तालुका वगळून सभापतीपदासाठी भाजपकडून कऱ्हाड, पाटण, खंडाळा, माण, खटाव या तालुक्यांतील सदस्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेनेकडून कराड, वाई, फलटण, माण, खटाव, पाटण आणि सातारा या तालुक्यातील सदस्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे इच्छुकांनाही आपल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे.

Satara ZP Sabhapati Election
Parbhani ShaktiPeeth Mahamarg: मोठी बातमी: शेतकर्‍यांच्या विरोधापुढे सरकार झुकलं, परभणी जिल्ह्यातला ‘शक्तिपीठ’चा मार्ग बदलणार

लॉटरी लागणार..?

झेडपीचा अध्यक्ष भाजपचा होण्यासाठी अपक्ष म्हणुन निवडुन आलेल्या कऱ्हाड तालुक्यातील भाजपच्या बंडखोर सदस्या विद्याताई रामकृष्ण वेताळ यांनी पक्षाला थेट पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षाकडुन त्यांना संधी दिली जावु शकते. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन कऱ्हाड दक्षिणमधून अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना संधी दिली जावु शकते. अॅड. उंडाळकर हे शिवसेनेलाही चालणार असल्याने त्यांच्या नावाचा विचार होवु शकतो.

तर शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणुन निवडून येऊन अडचणीच्या काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पाठिंबा दिलेले राजु शेळके यांच्याही नावाचा विचार ऐनवेळी होवु शकतो. भाजपकडून तालुक्यांचा समतोल साधण्यासाठी पाटण विधानसभा मतदारसंघात असणारे मात्र कऱ्हाड तालुक्यातुन निवडून आलेले भाजपचे सदस्य धनंजय ताटे यांनाही संधी दिली जाऊ शकते. त्याचबरोबर राष्ट्रवादी-शिवसेनेचे सभापती झाले तर त्यांच्याकडुन माण-खटावलाही संधी मिळु शकते.

Satara ZP Sabhapati Election
Gopichand Padalkar : अंजनगाव पुतळा वादावर मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये अभिजीत पाटलांसोबत काय चर्चा झाली होती? पडळकरांनी सांगितली इनसाईड स्टोरी...

झेडपीतील पक्षीय बलाबल

एकुण जागा - 65

भाजप - 27

राष्ट्रवादी काँग्रेस- 20

शिवसेना - 15

काँग्रेस -1

शेतकरी संघटना - 1

भाजपचे बंडखोर - 1 (अपक्ष)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com