

Satara, 07 March : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी येत्या २० मार्च रोजी होणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्यांना विशेष सभेची नोटीस देण्याबाबत कोणताही विलंब नाही. नियमांनुसार संबंधित सदस्यांना नोटीसा पाठविण्यात येतील. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव प्रशासनावर नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) अध्यक्षपदाच्या निवडीसाठी होणाऱ्या विशेष सभेची सदस्यांना नोटिसा देण्यास विलंब होत आहे, यामागे काही राजकीय दबाव आहे का? या प्रश्वावर पाटील म्हणाले, जिल्हा परिषद सदस्यांना विशेष सभेची नोटीस देण्याचा कालावधी नियमांनुसार आधीच निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसारच सर्व सदस्यांना अधिकृत नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणाचा कसलाही राजकीय दबाव प्रशासनावर नाही.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच पंचायत समितींच्या सभापती पदाच्या निवडीबाबत जिल्ह्यात उत्सुकता ताणली गेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी (Collector) संतोष पाटील यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. या निवडी शासकीय नियमांनुसार आणि ठरलेल्या कालावधीतच होतील. २० मार्चपूर्वी वेळेत निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले.
पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सदस्यांची नावे अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यानंतर राज्य शासनाने एका अधिसूचनेनुसार २० मार्चपूर्वी अध्यक्ष व सभापतिपदांच्या निवडी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व निवड प्रक्रिया नियोजित वेळेत आणि नि:पक्षपातीपणे पार पडतील.
काही जिल्हा परिषद सदस्य सध्या संपर्क कक्षाबाहेर असल्याची चर्चा आहे. याबाबत ते म्हणाले, की प्रत्येकाला राज्य घटनेने स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कोणी कुठे जावे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. नियमांनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सदस्यांना किमान दहा दिवस आधी सूचना देणे आवश्यक असते, तर पंचायत समिती सभापतिपदासाठी किमान सात दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक आहे. त्या नियमांचे पालन करत सर्व सदस्यांना निवड प्रक्रियेबाबत अधिकृत सूचना दिल्या जातील, असे प्रशासनाने सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा परिषद सदस्यांना नोटीस देण्याची प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार होणार असून त्यात कोणताही राजकीय दबाव नाही. प्रशासन पारदर्शक पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पाडेल.
पंचायत समिती सभापती-उपसभापतींची निवड 16 मार्चला होणार
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड २० मार्चला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समिती सभापती आणि उपसभापतिपदांची निवड संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी पाटील यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ मार्चला सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहेत. त्याबाबत नोटीस बजावणीचे काम तहसीलदारांकडे सोपविण्यात आलेले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.