Baramati News : बारामतीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय : आता प्रत्येक कामासाठी पुणे गाठण्याची गरज नाही; होणार 5 मोठे बदल

Baramati Additional Collector : बारामतीत सुरू होणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामुळे 5 मोठे प्रशासकीय बदल होणार असून नागरिकांना आता प्रत्येक कामासाठी पुण्याला जाण्याची गरज राहणार नाही.
Baramati News : बारामतीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय : आता प्रत्येक कामासाठी पुणे गाठण्याची गरज नाही; होणार 5 मोठे बदल
Published on
Updated on

पुणे जिल्ह्याचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बारामती येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन होणार असल्यामुळे नागरिकांना प्रत्येक कामासाठी पुण्यात येण्याची गरज राहणार नाहीये. या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात गती येणार असून स्थानिक पातळीवरच अनेक प्रश्न सुटणार आहेत.

जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने तसेच लोकसंख्या वाढल्याने महसूल आणि जमीनविषयक प्रकरणांचा मोठा ताण प्रशासनावर पडत होता. ग्रामीण भागातील नागरिकांना लांबचा प्रवास करून जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी 11 अप्पर जिल्हाधिकारी पदे निर्माण करण्याची शिफारस एका समितीने केली होती. त्या शिफारशीला सरकारने मान्यता दिली असून त्याअंतर्गत बारामती येथे नवीन पदास हिरवा कंदील मिळाला आहे.

Baramati News : बारामतीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय : आता प्रत्येक कामासाठी पुणे गाठण्याची गरज नाही; होणार 5 मोठे बदल
FIR against BJP leader : एकाच वेळी भाजप आमदारासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; राजकारणात मोठी खळबळ! नेमकं प्रकरण काय?

या कार्यालयामुळे पुनर्वसन शाखा, कुळ कायदा, महसूल विषयक प्रकरणे आणि अपील शाखेचे काम स्थानिक पातळीवर हाताळले जाणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात अपील करण्यासाठी नागरिकांना आता दूर जाण्याची गरज भासणार नाही. सुनावणी प्रक्रिया अधिक जलद होईल आणि अंतिम निर्णय देण्याची कार्यपद्धती अधिक सुसूत्र बनेल.

पूर्वी पुणे जिल्ह्यात 2 ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव होता. त्यामध्ये बारामती आणि आंबेगाव यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र सरकारने सध्या केवळ बारामती येथेच कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय देण्याऐवजी चाकण येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या भागात औद्योगिक व लोकसंख्येची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Baramati News : बारामतीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय : आता प्रत्येक कामासाठी पुणे गाठण्याची गरज नाही; होणार 5 मोठे बदल
माजी CM च्या सुनेने राजकारण सोडून निवडला UPSC चा मार्ग; 30 व्या रँकसह झाली IAS, संपूर्ण देशात चर्चा!

5 मोठे बदल:

  1. बारामतीत होणारे 5 मोठे बदल:

  2. स्थानिक पातळीवर महसूल आणि पुनर्वसन विषयक प्रकरणांचा निपटारा

  3. अपील अर्जांसाठी पुणे येथे जाण्याची गरज कमी

  4. बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांना थेट प्रशासकीय सुविधा

  5. जमीनविषयक खटल्यांच्या सुनावणीत वेग

ग्रामीण नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत या निर्णयामुळे प्रशासन अधिक सुसूत्र होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार असून सरकारी कामे अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com