Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंचं मोठं विधान : ‘विधान परिषद निवडणुकीत बहुमत गाठणं, ही भाजपची जबाबदारी’

Sangli-Satara Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी आवश्यक बहुमत मिळविण्याची जबाबदारी भाजपची असल्याचे सांगत शंभूराज देसाई यांनी महत्त्वपूर्ण राजकीय भाष्य केले आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 15 June : विधान परिषद निवडणुकीत आलेल्या परिस्थितीला भारतीय जनता पक्षाने आता सामोरे जायचं. जी परिस्थिती समोर आहे, निवडणुकीतील संख्याबळ दिसतंय. विजयासाठी ४५० पेक्षा जास्त मतं लागतात, त्यामुळे ते बहुमत गाठणं, ही भाजपची जबाबदारी आहे. ते गाठण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत, असे विधान शिवसेनेचे नेते तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

सातारा येथे माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी हे विधान केले आहे, त्यामुळे भाजपची टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. त्यांना ‘भाजप मित्रपक्षाच्या मदतीशिवाय विजयी होऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यावर उत्तर देताना शंभूराज देसाईंनी हे उत्तर दिले होते.

ते म्हणाले, भाजप आपल्या सदस्यांना अज्ञातस्थळी घेऊन जाणार आहे, हे मलाही आजच वर्तमानपत्रातून समजलं. भाजपचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना सातारा शहराच्या जवळील एका साखर कारखान्यावर एकत्र जमायला सांगितले आहे. तेथून पर्यटनासाठी काही लोकं जाणार आहेत, असं मला समजलं. पण मी काही त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.

आमची शिवसेनेची सातारा जिल्ह्याची जी कोअर कमिटी आहे, त्या कमिटीत संपर्कप्रमुख शरद कणसे, संजीवराजे निंबाळकर, राजेंद्र यादव, जयवंतराव शेलार, मी आणि आमचे नऊ ते दहा सदस्य आहेत. आम्ही विधान परिषद निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. त्यात असं ठरलं की आमच्या शिवसेनेच्या सदस्यांचीही मतं ऐकून घ्यावीत. सातारा जिल्ह्यात आमचंही ४६ मतदान आहे, त्यामुळे उद्या (ता. १६ जून) सकाळी अकरा वाजता सर्व मतदारांची साताऱ्यात बैठक बोलावली आहे, असेही मंत्री देसाई यांनी नमूद केले.

Shambhuraj Desai
MLC Election : भाजपला धास्ती कोणाची? : सांगलीत ‘जयंत’नीतीची, तर साताऱ्यात ‘दुखावलेल्या मित्रां’ची; सदस्यांना पाठविले अज्ञातस्थळी

ते म्हणाले, आमची दहा ते अकरा लोकांची कोअर कमिटी सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेईल. शेवटी कोअर कमिटीलाही मर्यादा आहेत, आम्ही त्यांचं म्हणणं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालू. शिवसेनेचा निर्णय मुंबईत होईल, कारण मिटिंग झाल्यानंतर आम्ही शिंदेंकडे गोपीनीय अहवाल पाठवू. त्यांच्याकडून जो आदेश येईल, त्याप्रमाणे आमचा निर्णय होईल.

महायुतीच्या समन्वय बैठकीकडे पाठ का फिरवली, हे सांगताना शंभूराज देसाई म्हणाले, पालकमंत्री म्हणून नगरपालिका निवडणुकीत मी महायुतीमध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न केला. माझ्या निमंत्रणाला भाजपचे दोन्ही मंत्री आणि आमदारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असेही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

देसाई म्हणाले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हाही त्यांनी कोणी प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री समन्वय ठरवण्यासाठी बैठक बोलवतात, तेव्हा तुम्ही येत नाही आणि समन्वय समितीच्या बैठकीदिवशी तुम्ही भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, असं जाहीर करता. मग तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हालाही विचार करावा लागला ना.

Shambhuraj Desai
MLC Election : मकरंदआबांच्या भूमिकेने भाजपची धाकधूक वाढवली; ZPतील वागणुकीबाबत सदस्यांच्या भावना तीव्र

बैठकीचा मला निरोप आला होता; पण...

महायुतीच्या समन्वय बैठकीला असा मला निरोप आला होता. मात्र, मी त्या दिवशी साताऱ्यात नव्हतो, नेमका बाहेरगावी होतो, त्यामुळे कराड येथे झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला मला जातं आलं नाही, असं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com