
Solapur, 12 August : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा सोलापुरातील स्थानिक कार्यकर्ता शरणू हांडे याचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या सातही आरोपींना आज (ता. १२ ऑगस्ट) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी अमित सुरवसे याने शरणू हांडे प्रकरणाबाबत लवकरच प्रेस घेऊन सर्व काही सांगणार असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे हांडेचे अपहरण करून ब्लेड, साडी, निरोधाची पाकिटे का घेतली होती, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
शरणू हांडे ( Sharanu Hande ) याचे अपहरण करून त्याना कर्नाटकच्या दिशेने घेऊन जात असताना पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संशयित आरोपींना पकडण्यात यश मिळविले हेाते. शरणू हांडे यांचा सुटका करण्यासाठी पोलिसांनी संशयित आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदाराचा सिनेस्टाईल पाठलाग केला हेाता. शेवटी कर्नाटकातील झळकीजवळ पोलिसांनी शरणू हांडे याची अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदाराच्या तावडीतून सुटका केली होती.
दरम्यान, अमित सुरवसे यांच्या सोबतच्या तीन मित्रांनी अगोदरच वाहनातून उतरले होते. त्यामुळे पोलिसांनी अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने या चौघांना अटक केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी राकेश भीमाशंकर कुदरे, श्रीकांत बाबूराव सुरपुरे, समर्थ वासुदेव भैरी यांना पकडण्यात आले होते. या सर्वांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सोलापूर (Solapur)न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते.
पोलिसांनी सात संशयित आरोपींपैकी दोघांची पोलिस कोठडी मागितली होती. पण, न्यायालयाने सर्व सातही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजानंतर या सातही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. त्या वेळी अमित सुरवसेशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
त्या वेळी अमित सुरवसे याने शरणू हांडे अपहार प्रकरणी लवकरच मी प्रेस घेऊन सगळं क्लिअर करणार आहे. माझ्यावरील सर्व आरोप हे खोटे आहेत. मी एकदा समोरासमोर बोललो आहे, असेही सुरवसे याने स्पष्ट केले. त्यामुळे शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी काही नवीन उघड होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.