Shahaji Patil : शहाजीबापूंनी अजितदादांना सुनावलं ; म्हणाले, "काळजी करु नका.."

Shahaji Patil latest news : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय अजित दादांनी पत्रकारांसमोर ठेवावेत.
Shahaji Patil, ajit pawar
Shahaji Patil, ajit pawarsarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड : एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात दोघांचेच मंत्रीमंडळ अस्तित्वात आहे. दोघांच्या मंत्रीमंडळावर चौफेर टीका होत आहे.

शिंदे गट आणि भाजपला मंत्रीमंडळ विस्तार मार्गी लावणे शक्य झालेले नाही. यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला घेरले आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यावरुन शिंदे सरकारवर काल निशाणा साधला होता. त्यावरुन शिवसेना बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (shahaji patil) यांनी टोला लगावला आहे. (Shahaji Patil latest news)

"सुधाकर नाईक यांच्यावेळी झालेल्या बंडामुळे पावणे दोन महिने मंत्रालय बंद होतं. त्यांच्याच मंत्रीमंडळात अजित पवार राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराची फार काळजी करण्याचे कारण नाही. राज्यात चांगला कारभार सुरु आहे. मंत्रीमंडळ विस्तार थोड्याच दिवसात मार्गी लागेल," असा टोला शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांना लगावला.

Shahaji Patil, ajit pawar
Shrikant Deshmukh : वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी भाजपच्या देशमुखांना तूर्त दिलासा

विरोधी पक्षनेते पवार यांनी मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने कामे रखडली आहेत. त्याप्रश्नावर आमदार पाटील हे काल (शनिवारी) कऱ्हाड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होईल. सुधाकर नाईक यांच्यावेळी झालेल्या बंडामुळे पावणे दोन महिने मंत्रालय बंद होतं. अजित पवार त्यात राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराची फार काळजी करण्याचे काही कारण नाही. काही राजकीय परिस्थिती आल्यावर चार दिवस मागे-पुढे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार चांगला चालला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय अजित दादांनी पत्रकारांसमोर ठेवावेत,"

खासदार संजय राऊत यांच्यावरील इडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "ईडी कोणालाही उठून अटक करु शकत नाही. जर संजय राऊत निर्दोष आहेत असं त्यांच्या बंधूना म्हणायचे असेल तर कोर्टासमोर निर्दोषत्व का सिध्द करु शकला नाही. ते सिध्द करुन जामीनावर सुटुन बाहेर यावे. ते जर तुम्ही सिध्द करु शकला नाही तर जे जगासाठी ते तुमच्यासाठीही आहे. तुम्ही स्वतःला स्पेशल केस समजू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सर्वांना समान दर्जा, हक्क दिले आहेत. त्यापुढे कोण मोठ, कोण लहान नाही. त्यामुळे संजय राऊत हे स्पेशल केस नाही. तेही सर्वासमानच आहेत.

आम्हीच सध्या मोठे भाऊ

सध्या महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमच्याकडेच मुख्यमंत्रीपद आहे. त्यामुळे आम्हीच सध्या मोठे भाऊ आहोत. माजी आमदार आनंदराव पाटील यांनी आता आमच्या शिंदे गटात सामील व्हावे, असा आवाहन आमदार शहाजीबापु पाटील यांनी केले.

आज ३८ दिवस उलटूनही मंत्रीमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नसल्याने इच्छुकांची अडचण झाली आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांची यादी तयार असली, तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजपच्या मंत्र्यांची यादी अंतिम करणार असल्याने विस्ताराचे गाडे अद्याप अडल्याचे समजते. दुसरीकडे माजी मंत्र्यांनी अजून सरकारी बंगले सोडले नसल्यावरुन चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com