BJP Vs Sanjay Raut : संजय राऊत हे बिश्नोई टोळीचे टीपर आहेत का? : भाजप मंत्र्यांनी तोफ डागली

Jaykumar Gore Statement : अमित शहांवरील टीकेला जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत बिश्नोई टोळीचे खबरे आहेत का, असा सवाल करत त्यांच्या चौकशीची मागणी केली. पंढरपूर दौऱ्यात त्यांनी राज ठाकरेंवरही टीका केली.
 Sanjay Raut-Jaykumar Gore
Sanjay Raut-Jaykumar Gore Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pandharpur, 22 October : खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत हेच बिश्नोई टोळीचा खबऱ्या आहे का? त्यांना सगळं कसं माहिती?, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.

पालकमंत्री जयकुमार गोरे गुरुवारी (ता. २२ ऑक्टोबर) पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

जयकुमार गोरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांवर मला काही माहीत नाही. मी निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने मी ती क्लिप ऐकलेली नाही.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे पाच वर्षांत पाच भूमिका घेतात. ठाकरे यांच्या पक्षाला अस्तित्व नाही, ते कधी मोदींचे कौतुक करतात, तर दोन वेळा मोदींच्या विरोधात बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

 Sanjay Raut-Jaykumar Gore
Shambhuraj Desai On Jarange Patil : शंभूराज देसाईंचा जरांगे पाटलांवर पलटवार : हे तर एकनाथ शिंदेंच्या विरोधातील षडयंत्र

संजय राऊत हे काही बिश्नोई टोळीचे टीपर आहेत का? त्यांना एवढी कशी माहिती असते. त्यांची चौकशी व्हायला हवी, असे म्हणत संजय राऊत यांचावरही हल्लाबोल केला.

बोगस शिक्षकांनो मतदान करू नका; अन्यथा...

पुणे विभाग शिक्षक निवडणूक मतदार यादीत ज्यांची नावे बोगस पद्धतीने आली आहेत, त्यांनी मतदान करू नये; अन्यथा गुन्हे दाखल होतील. बार्शी येथे बोगस मतदान नोंदवण्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.

 Sanjay Raut-Jaykumar Gore
Satara Dcc Bank : जयकुमार गोरेंनी आपल्या मित्राला अखेर जिल्हा बॅंकेत बिनविरोध आणलेच; महत्वाच्या क्षणी लावली ताकद

शिक्षण संस्था अस्तित्वात नसताना त्यांची मतदार यादीत नावे नोंदविण्यात आलेली आहेत, ही गंभीर बाब समोर आली आहे. यामागे कोण आहे, याचा तपास होईल. काही उमेदवार यामागे असल्याचे समोर आले तर त्यांच्यावरही भविष्यामध्ये कारवाई होईल, असा इशाराही पालकमंत्री गोरे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com