Sharad Pawar News : शरद पवारांच्या सभेला अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती; कोल्हापूरमध्ये नवी राजकीय गणितं ?

Sharad Pawar Kolhapur Tour : ऐतिहासिक दसरा चौकात दोन दिग्गज नेते..
Sharad Pawar News :
Sharad Pawar News : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) २५ ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर पवारांचा पहिलाच कोल्हापूर दौरा असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शरद पवार यांची सभा ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे. या सभेला अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिली. (Latest Marathi News)

Sharad Pawar News :
Sharad Pawar Rally In Beed : कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या.. ; शरद पवारांची तोफ धडाडण्यापूर्वीच मुंडे समर्थकांकडून बॅनरबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर शरद पवार राज्यभर दौरे करत आहेत. या दौऱ्यामध्ये पवार यांच जोरदार स्वागत होत आहे. आता 25 ऑगस्टला शरद पवार कोल्हापूरमध्ये येणार आहेत. या दौऱ्यात शरद पवार यांची सभा ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोल्हापूरमध्ये शरद पवार यांचे खंदे समर्थक हसन मुश्रीफ-अजित पवार यांच्यासोबत गेल्याने पवारांच्या या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळणार याची उत्सुकता आहे.

Sharad Pawar News :
Loksabha Election BJP Masterplan: आगामी निवडणुकीपूर्वी भाजपचा 'मास्टर प्लॅन'; 350 आमदारांना दिले जाणार विशेष ट्रेनिंग

या दौऱ्यात शरद पवार यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील असणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीसाठी माजी आमदार राजू आवळे, अश्विनी माने, पद्मा तिवले, अनिल पवार उपस्थित होते. (Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.